नुसरत जहांने केलं दुसरं लग्न?; इन्स्टाग्रामवर यश दासगुप्तासोबत फोटो केला शेअर
अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहां आपल्या वैवाहिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी निखिल जैनसोबत घटस्फोट झाल्याच्या चर्चेनंतर नुसरतने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर आता नुसरत जहांने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोतून दुसरं लग्न केल्याचं समोर आलं आहे. नुसरतने पहिल्यांदाच यश दासगुप्ता पती असल्याचं मान्य केलं आहे. अभिनेत्री नुसरत जहांने काही महिन्यांपूर्वी निखिल जैनसोबत घटस्फोट घेत […]
ADVERTISEMENT

अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहां आपल्या वैवाहिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी निखिल जैनसोबत घटस्फोट झाल्याच्या चर्चेनंतर नुसरतने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर आता नुसरत जहांने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोतून दुसरं लग्न केल्याचं समोर आलं आहे. नुसरतने पहिल्यांदाच यश दासगुप्ता पती असल्याचं मान्य केलं आहे.
अभिनेत्री नुसरत जहांने काही महिन्यांपूर्वी निखिल जैनसोबत घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, घटस्फोटाच्या घोषणेनंतर नुसरतने एका मुलाला जन्म दिला. मात्र, या मुलाच्या पिता कोण यावरून नुसरतला प्रश्न विचारले जात होते. त्यातच मुलाच्या जन्मदाखल्यावर यश दासगुप्ताचं नाव आल्यानं हे मुल त्याचं असल्याचं म्हटलं जात होतं.
अखेर अभिनेत्री नुसरत जहांने पहिल्यांदाच यश दासगुप्तासोबत असलेल्या नात्याचा खुलासा केला आहे. नुसरत जहांने यश दासगुप्ता पती असल्याचं सार्वजनिकपणे मान्य केलं आहे. अभिनेत्रीने यश दासगुप्ताच्या वाढदिवसाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
नुसरत जहांने इन्स्टाग्राम स्टोरीवर हे फोटो शेअर केले आहेत. केक आणि यश दासगुप्तासोबत डिनर डेटचा फोटो शेअर केले आहेत. केक दोन भागांमध्ये असून, केकच्या वरच्या भागामध्ये हसबंड (पती) असं लिहिलेलं आहे. त्याचबरोबर त्यावर एक कपल शॅडोही आहे.