Kangana Vs Alia : 'कन्या मान' वरून आलियाला कंगना म्हणाली भोळ्या ग्राहकांची फसवणूक थांबवा!

इंस्टाग्राम पोस्ट लिहून कंगनाने आलिया आणि मोहे ब्रांडवर टीका केली आहे
Kangana Vs Alia : 'कन्या मान' वरून आलियाला कंगना म्हणाली भोळ्या ग्राहकांची फसवणूक थांबवा!

अभिनेत्री आलिया भटने Alia bhatt ने मोहे या ब्रांडसाठी केलेली जाहिरात चांगलीच चर्चेत आहे. यावरून आलियाला अनेकांनी ट्रोलही केलं आहे. फक्त हिंदू धर्मातील प्रथा-परंपराच मिळतात का? असा सवाल आलियाला अनेकांनी केला आहे. ट्विटरवर आलियाला प्रचंड प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. कन्यादान नव्हे कन्या मान अशी ही मोहे ब्रांडची जाहिरात आहे. आता आलियावर टीका करणाऱ्यांमध्ये बिनधास्त बेधडक अभिनेत्री कंगनाचाही समावेश झाला आहे. तिने या जाहिरातीवरून आलियाला आणि सगळ्या जाहिरात निर्मिती करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

कंगनाने काय म्हटलं आहे तिच्या इंस्टा पोस्टमध्ये?

सगळ्या ब्रांड्सना माझी नम्र विनंती आहे की वस्तूंच्या विक्रीसाठी धर्म, अल्पसंख्याक, बहुसंख्याक असं राजकारण करू नका. हिंदू धर्म आणि त्यांच्या परंपरांचा अपमान करू नका. आपण अनेकदा टीव्हीवर बातमी पाहतो की आपल्या लष्करातील जवान शहीद झाला. त्याच्या वडिलांची प्रतिक्रिया असते माझा दुसरा मुलगाही मी भारतमातेचीच सेवा करेल. कन्यादान असो किंवा पुत्रदान असो समाज ज्या प्रकारे या संकल्पनांकडे पाहतो त्यातून या परंपरांवर असलेला विश्वासच व्यक्त होतो. कुणीही या परंपरेला दुय्यम महत्त्व देऊ नये. पृथ्वी आणि स्त्री या दोन्हींचा उल्लेख शास्त्रांमध्ये आई असा केला गेला आहे. त्यांची पूजा केली जाते त्यांना एक अमूल्य ठेवा समजलं जातं आणि त्यांना अस्तित्वाचं केंद्र मानन्यात काहीही नुकसान नाही. असं म्हणत ही पोस्ट कंगनाने आलिया भट, मोहे ब्रांड यांना सगळ्यांना टॅग केली आहे.

काय आहे प्रकरण?

आलिया भटने एक जाहिरात केली आहे. मान्यवर या कपड्यांच्या ब्रांडची ही जाहिरात आहे. या जाहिरातीत आलिया एका वधूच्या रूपात दिसते आहे. या जाहिरातीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत लोकांनी आलिया भटला हिंदू धर्मावरून प्रश्न विचारण्यास सुरूवात केली आहे. काही नेटकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जाहिरातीतून हिंदू धर्म, प्रथा आणि परंपरा यांनाच का दाखवलं जातं? काहींना मात्र ही जाहिरात आवडली आहे. त्यांनी आलियाचं याबाबत कौतुकही केलं आहे.

काय आहे जाहिरात?

या जाहिरातीत आलिया नववधूच्या रूपात दिसते. ती म्हणते 'आजी लहानपणापासून सांगायची तू जेव्हा आपल्या घरी जाशील तेव्हा मला तुझी खूप आठवण येईल. हे माझं घर नाही? पप्पांनी माझे खूप लाड केले आहेत. मी शब्द काढायचा अवकाश वस्तू हजर. सगळे म्हणतात मुलगी परक्याचं धन असते तिला बिघडवू नका. त्यांनी ऐकलं नाही. मात्र कधीच हेदेखील म्हणाले नाहीत की परक्याचं धन आहे. आई म्हणते मी चिऊताई आहे. आता (लग्नानंतर) माझं दाणा-पाणी दुसरीकडे आहे. पण चिमणीचं तर अवघं आकाश असतं ना? वेगळं होणं.. परकं केलं जाणं... कुणा दुसऱ्याच्या हाती हात सोपवलं जाणं.. मी दानाची वस्तू आहे का? कन्यादान का? असं आलिया म्हणते आणि त्यानंतर वराचे आई वडील त्याचा हात पकडून आलियाच्या हाती देतात. शेवटी आलिया म्हणते नवी आयडीया कन्यादान नाही कन्या मान'

यावरूनच आलियावर प्रचंड टीका झाली आता अभिनेत्री कंगनानेही तिला आणि मोहे ब्रांडला खडे बोल सुनावले आहेत. या आधी कंगनाने आलिया भटच्या 'गंगुबाई काठियावाडी' सिनेमच्या ट्रेलरचीही खिल्ली उडवली होती. आता पुन्हा एकदा कंगनाने आलियावर टीकास्त्र सोडलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in