मास्क न लावणाऱ्यांवर करिना कपूर संतापली; म्हणाली…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढतेय. अनेक ठिकाणी बेड्स तसंच ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय. ही सर्व परिस्थिती चिंताजनक आहे. सरकारकडून मास्क तसंच सॅनिटायझरच्या वापराचं आवाहन केलं जातंय. मात्र अनेकजण मास्कचा वापर करताना दिसत नाहीत. अशा लोकांवर अभिनेत्री करिना कपूर खानने संताप व्यक्त केला आहे.

करिनाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने “मला अजूनही कळत नाही लोकं इतक्या निष्काळजीपणे कसे वागू शकतात. सध्या आपल्या देशातील परिस्थिती किती गंभीर आहे याची त्यांना कल्पना असूनही ते असं कसं वागतात हेच मला समजत नाही. प्रत्येक व्यक्तीने घराबाहेर पडाताना योग्य पद्धतीने मास्क लावणं गरजेचं आहे.”

करिना तिच्या पोस्टमध्ये पुढे म्हणते, “परंतु अनेक जण हनुवटीच्या खाली मास्क लावून फिरतात. चुकीच्या पद्धतीने काहीजण मास्क लावतात आणि कोरोनो नियमांकडे दुर्लक्ष करतात. अशा पद्धतीने वागणाऱ्या व्यक्तींनी एकदा दिवसरात्र कोरोनाविरोधात लढणाऱ्या डॉक्टर तसंच वैद्यकीय अधिकाऱ्यांबाबत विचार करायला पाहिजे. ते देखील मानसिकदृष्या दमले आहेत. ही पोस्ट वाचणारा प्रत्येकजण चेन तोडण्यासाठी जबाबदार आहे.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान करिनाच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी काही लोकांनी तिला पोस्टमध्ये लिहिलेल्या गोष्टी भाऊ रणबीर कपूरला सांगण्यास सांगितलं आहे. कारण तो सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मालदीवला गेला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT