'..कारण ते स्वत: भाकड अन् भोंदू आहेत' कॅप्टन अशोक खरात प्रकरणी उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

Uddhav Thackeray on Ashok Kharat : 'जो महाराष्ट्र आपण पुढे नेऊ इच्छितोय, त्यात जादूटोणाविरोधी कायद्याचे पालन कठोरपणे झाले पाहिजे. कर्तृत्त्वशून्य जे नेते आहेत त्यांना असे मार्ग अवलंबावे लागतात.  त्यांना अशा ज्या काही भाकडकथा आहेत किंवा भोंदूगिरी आहे त्याचा आसरा घ्यावा लागतो कारण ते स्वत: भाकड अन् भोंदू आहेत', अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray on Ashok Kharat
Uddhav Thackeray on Ashok Kharat
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'..कारण ते स्वत: भाकड अन् भोंदू आहेत'

point

कॅप्टन अशोक खरात प्रकरणी उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

point

नेमकं काय म्हणाले?

Uddhav Thackeray on Ashok Kharat : 'जो महाराष्ट्र आपण पुढे नेऊ इच्छितोय, त्यात जादूटोणाविरोधी कायद्याचे पालन कठोरपणे झाले पाहिजे. कर्तृत्त्वशून्य जे नेते आहेत त्यांना असे मार्ग अवलंबावे लागतात.  त्यांना अशा ज्या काही भाकडकथा आहेत किंवा भोंदूगिरी आहे त्याचा आसरा घ्यावा लागतो कारण ते स्वत: भाकड अन् भोंदू आहेत', अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुंबईतील शिवसेना भवन येथे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एक्सपोर्ट इम्पोर्ट कोर्सचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील सद्यस्थितीविषयी ते बोलत होते. यावेळी ते नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया.

राजकारणातील भोंदूंवर कारवाई झाली पाहिजे

महाराष्ट्रातील सद्यस्थितीविषयी बोलताना ठाकरे म्हणाले, 'आणखी किती खालच्या पातळीला आपण महाराष्ट्र नेणार आहोत. महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा आहे. त्या कायद्याचे पालन करणारेच जर अशा भोंदूंच्या नादाला लागणार असतील तर त्या भोंदूबाबांबरोबर त्यांच्या भोंदू भक्तांवरसुद्धा कारवाई झाली पाहिजे, जे राजकारणात दिसतात.'

हे ही वाचा : 'मी त्यांचा राजीनामा..' रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

कारण ते स्वत: भोंदू अन् भाकड

यापुढं बोलताना ठाकरे म्हणाले की, 'जो महाराष्ट्र आपण पुढे नेऊ इच्छितोय, त्यात जादूटोणाविरोधी कायद्याचे पालन कठोरपणे झाले पाहिजे. कर्तृत्त्वशून्य जे नेते आहेत त्यांना असे मार्ग अवलंबावे लागतात.  त्यांना अशा ज्या काही भाकडकथा आहेत किंवा भोंदूगिरी आहे त्याचा आसरा घ्यावा लागतो कारण ते स्वत: भाकड अन् भोंदू आहेत. हे भोंदू नेते ज्यांच्यामध्ये कर्तृत्व नाही, स्वकर्तृत्त्वाने जे काही करु शकत नाहीत त्यांना अशा गोष्टींचा आधार घ्यावा लागतो.'

'पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळू द्या'

भोंदू अशोक खरात याच्या संस्थानाला महाविकास आघाडीच्या काळात दारणा धरणाचे पाणी वळवण्यात आले. याविषयी विचारले असता ठाकरे म्हणाले की, 'सगळ्याची चौकशी करा माझं काही म्हणणं नाही. कारण पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळू द्या. जो गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षा करा. हे पाणी वळवलं असेल तर हे पाणी कुठंपर्यंत मुरलंय हे कळू द्या. फक्त कळल्यानंतर त्यावर काहीचरी कारवाई झाली पाहिजे.'

हे वाचलं का?

    follow whatsapp