'मी त्यांचा राजीनामा..' रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
Sunetra Pawar On Rupali Chakankar : भोंदू अशोक खरात प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काल रात्री राजीनामा दिला होता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा सुपूर्द केला होता. विकृत खरातच्या प्रकरणात चाकणकरांनी राजीनामा द्यावी अशी मागणी राज्यातील अनेक नेते, महिला संघटनांनी केली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'मी त्यांचा राजीनामा..'
रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
Sunetra Pawar On Rupali Chakankar : भोंदू अशोक खरात प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काल रात्री महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची शासकीय निवासस्थान 'देवगिरी' येथे भेट घेऊन त्यांनी आपले राजीनामा पत्र सोपवले. विकृत खरातच्या प्रकरणात चाकणकरांनी राजीनामा द्यावी अशी मागणी राज्यातील अनेक नेते, महिला संघटनांनी केली होती. त्यानंतर चाकणकरांनी फडणवीसांची भेट घेतली होती. दरम्यान, या राजीनाम्याविषयी सुनेत्रा पवार यांनी एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय, जाणून घेऊया.
हे ही वाचा : 'अशोक खरातसोबत अनेक लोकांचे फोटो आहेत', रुपाली चाकणकरांचं मोठं विधान
पोस्टमध्ये सुनेत्रा पवार काय म्हणतात?
सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये सुनेत्रा पवार यांनी लिहिलं की, 'महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मला प्राप्त झाला आहे. सद्य परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून मी त्यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवत आहे.'
हे ही वाचा : शिवनिका संस्थानसाठी 39 लाख लिटर पाणी देण्यास देण्यात आली होती मंजुरी, कॅप्टन खरातचा शासन दरबारी होता दबदबा
राजीनाम्यानंतर चाकणकरांचं स्पष्टीकरण
राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकरांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या आरोपांबाबत त्यांनी यावेळी स्पष्टीकरण दिले. महिला असल्यामुळे मला सॉफ्ट टार्गेट केल्याचं चाकणकर म्हणाल्या. पुढं बोलताना त्या म्हणाल्या की, खरातचे अनेकजणांसोबत फोटो आहेत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी आणि माझे पती आणि संपूर्ण कुटुंब कार्यक्रमाला उपस्थित राहत होतो. माध्यमांमधून दाखवले जाणारे व्हिडिओ काही वर्षापूर्वीचे आहेत. गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने अनेकांनी पाद्यपूजा केली होती. 5-6 वर्षापूर्वी आपण ज्या लोकांच्या संपर्कात असतो त्यानंतर 5-6 वर्षात एखाद्याची वागणूक कशी असेल याबाबत आपल्याला कोणतीही सुतराम कल्पना नसते.'










