दारू पिण्यावरून नवरा-बायकोमध्ये वाद, पतीने पत्नीला बेदम मारहाण करत ठार मारलं

मुंबई तक

Mumbai Crime : मुंबईतील वडाळातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दारू पिण्यावरून नवरा-बायकोमध्ये वाद झाला. याच वादातून नवऱ्याने बायकोला बेदम मारहाण करत ठार केले.

ADVERTISEMENT

Mumbai crime
Mumbai crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नवऱ्याकडून पत्नीची हत्या 

point

आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल

Mumbai Crime : मुंबईतील वडाळातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दारू पिण्यावरून नवरा-बायकोमध्ये वाद झाला. याच वादातून नवऱ्याने बायकोला बेदम मारहाण करत ठार केले. मृत महिलेची ओळख कविता महेश वाड (वय 29) अशी आहे. मुंबई पोलिसांनी सांगितलं की, आरोपी पती महेश नारायण वाड घटनेनंतर घटनास्थळावरून फरार झाला, परंतु नंतर त्याला अटक करण्यात आली होती. 

हे ही वाचा : नांदेड शहरानजीक गावात चालत्या दुचाकीसह तरुण जळून खाक, अपघात की घातपात?

नवऱ्याकडून पत्नीची हत्या 

संबंधित प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आरोपीने आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली, तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, ज्यात ती गंभीर जखमी झाली. नंतर कविताला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, वेळेवर उपचार न झाल्याने तिची प्रकृती खालावली. शवविच्छेदनातून समोर आले की,  कवितावर अत्यंत गंभीर शारीरिक हल्ला झाला होता. तिच्या शरीरावर अनेक काळे-निळे डाग होते. 

आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल

दरम्यान, वडाळा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम (103) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून नवऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. कविताचा भाऊ शुभम रमेश लोधी यांने ही तक्रार दाखल केली. 

हे ही वाचा : बंदुकीचा धाक दाखवून महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार, आधी लग्नाचे दिले आमिष... लाज आणणारी घटना

प्राथमिक तपासातून, कविता आणि महेश वाड हे वडाळ्यातील गणेश मंदिराजवळील गणेशनगरमध्ये राहत होते. संबंधित प्रकरणात पोलिसांनी सांगितले की, आरोपी दारूच्या आहारी गेला होता, ज्यामुळे त्या दोघांमध्ये वारंवार वाद होत असत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp