शौचालयाच्या छतावर तरुणाचा नग्न अवस्थेत मृतदेह, कंडोमचं आढळलं पॅकेट, तोंडातून येत होता फेस... भलतंच कांड समोर

मुंबई तक

crime news : शौचालयाच्या छतावर तरुणाचा एक मृतदेह आढळून आला होता. या घटनेनं परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या तरुणाकडे एक कंडोमचे पाकीट होते, त्याच्या तोंडातून फेस येत असून मृतदेह नग्न अवस्थेत आढळून आला होता.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मृतदेह शौचालयाच्या छतावर नग्न अवस्थेत

point

खून आणि अनैतिक संबंधातून पोलिसांचा तपास 

crime news : उत्तर प्रदेशातील गोरखपूरहून एक खळबळजनक घटना उघडकीस आली. शौचालयाच्या छतावर तरुणाचा एक मृतदेह आढळून आला होता. या घटनेनं परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या तरुणाकडे एक कंडोमचे पाकीट होते, त्याच्या तोंडातून फेस येत असून मृतदेह नग्न अवस्थेत आढळून आला होता. या परिस्थितीमुळे खून, कट आणि अनैतिक संबंधामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 

हे ही वाचा : '..कारण ते स्वत: भाकड अन् भोंदू आहेत' कॅप्टन अशोक खरात प्रकरणी उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?

संबंधित घटना ही गगाह पोलीस ठाणे हद्दीतील रावत पार गावात घडल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी, महामार्गाजवळील एका पिठाच्या गिरणीमागील शौचालयाच्या छतावर ग्रामस्थांनी त्या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळी जमाव जमला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. 

मृताची ओळख ऋषभ अशी पटल्याची माहिती आहे. तो नुकताच बँकॉकहून आपल्या गावी परतला होता. तो तिथे आपल्या वडिलांसोबत राहत होता आणि काम करायचा. कुटुंबीयांच्या म्हणण्यांनुसार, तो आपल्या बहिणीच्या लग्नासाठी परदेशात आला होता. लग्नानंतर त्याचे वडील परत गेले, तर वृषभ हा गावातच राहिला होता. 

मृतदेह शौचालयाच्या छतावर नग्न अवस्थेत

आश्चर्याची गोष्ट अशी की, जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा मृतदेह शौचालयाच्या छतावर नग्न अवस्थेत आढळला होता. तिच्या हातात एक कंडोमचे पाकीट होते. तर तिचे कपडे जवळच्याच एका झाडाला लटकलेले आढळून आले होते, मृतदेहाच्या तोंडातून फेस येत होता, ज्यामुळे हे प्रकरण अधिकच संशयास्पद बनले होते. 

हे वाचलं का?

    follow whatsapp