तरुणीला लग्न करणे महागात पडले, जीवानिशी गेली; 'त्या' कारणाने विकृत पतीनेच चिरला गळा
Crime News : रेखाचा विवाह काही वर्षांपूर्वी भालेसुल्तान येथील मंशाराम याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुखाचा संसार करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या रेखाला पतीच्या विवाहबाह्य संबंधांची कुणकुण लागली होती. मंशारामचे एका तरुणीवर प्रेम होते आणि लग्नानंतरही तो तासनतास तिच्याशी फोनवर बोलत असे. रेखाने अनेकवेळा या नात्याला विरोध केला आणि पतीला सुधारण्याचा प्रयत्न केला, मात्र मंशारामने तिचे ऐकण्याऐवजी तिला कायमचे वाटेतून बाजूला काढण्याचा कट रचला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तरुणीला लग्न करणे महागात पडले, जीवानिशी गेली;
'त्या' कारणाने विकृत पतीनेच चिरला गळा
Crime News : पतीने आपल्या प्रेम प्रकरणात अडथळा ठरत असलेल्या पत्नीची क्रूरपणे हत्या केली आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातून नात्याला काळिमा फासणारी क्रूर घटना समोर आलीये. या प्रकरणात पोलीसांनी आरोपीला पतीला अटक केली असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घेऊयात..
अधिकची माहिती अशी की, अमेठीच्या गौरीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डिगुर हृदय शाह गावातील रहिवासी असलेल्या रेखाचा विवाह काही वर्षांपूर्वी भालेसुल्तान येथील मंशाराम याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुखाचा संसार करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या रेखाला पतीच्या विवाहबाह्य संबंधांची कुणकुण लागली होती. मंशारामचे एका तरुणीवर प्रेम होते आणि लग्नानंतरही तो तासनतास तिच्याशी फोनवर बोलत असे. रेखाने अनेकवेळा या नात्याला विरोध केला आणि पतीला सुधारण्याचा प्रयत्न केला, मात्र मंशारामने तिचे ऐकण्याऐवजी तिला कायमचे वाटेतून बाजूला काढण्याचा कट रचला. 16 मार्च 2026 रोजी, जेव्हा रेखा होळीच्या सणासाठी आपल्या माहेरी आली होती, तेव्हा मंशारामने तिला एका शेतात भेटण्यासाठी बोलावले. रेखा तिथे पोहोचताच त्याने लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यावर वर्मी घाव घालून तिची निर्घृण हत्या केली आणि घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून एका संशयास्पद मृत्यूचे रूपांतर आता एका नियोजित हत्याकांडाच्या तपासात झाले आहे.
पोलिसांचा तांत्रिक तपास आणि आरोपी पतीला अटक
या प्रकरणाचा तपास करत असताना अमेठी पोलिसांनी अत्यंत चतुराईने पुरावे गोळा केले आणि गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. सुरुवातीला मृत महिलेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता, मात्र तपासादरम्यान पोलिसांना एक महत्त्वाचा धागा मिळाला. घटनेच्या दिवशी आरोपी मंशाराम याच्या दुचाकीचे पोलिसांनी एका ठिकाणी चलान फाडले होते, ज्यामुळे त्याचे लोकेशन संशयाच्या भोवर्यात आले. अपर पोलीस अधीक्षक ज्ञानेंद्र कुमार सिंह यांनी माहिती दिली की, पोलिसांनी विविध पथके तयार करून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मंशारामचा शोध घेतला आणि अखेर त्याला अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि प्रेयसीशी असलेल्या संबंधांत पत्नी अडथळा ठरत असल्याने तिची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले साधन जप्त केले असून आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. सुखाचा संसार उधळून लावून प्रेमासाठी स्वतःच्या पत्नीचा बळी घेणाऱ्या या नराधम पतीच्या कृत्याबद्दल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.










