विवाहित महिलेला मदत केल्याने सरपंचाची हत्या, संतापलेल्या पतीने क्रूरपणे संपवलं

मुंबई तक

Crime News : पिंदर कौर नावाच्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, सरपंच हॅप्पी तिला मदत करत असल्याने तिचा पती मनप्रीत सिंह उर्फ बबलू आणि त्याच्या कुटुंबीयांनी या हत्येचा कट रचला होता. मृताच्या वडिलांनीही आपल्या जबाबात संशय व्यक्त केला होता की, मुलगा एका विवाहित महिलेला मदत करत असल्याने तिच्या पतीने रागाच्या भरात हे पाऊल उचलले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विवाहित महिलेला मदत केल्याने सरपंचाची हत्या

point

संतापलेल्या पतीने क्रूरपणे संपवलं

Crime News : पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील बाघापुराणा येथे 6 मार्च रोजी घडलेल्या सरपंच हरविंदर सिंह उर्फ हॅप्पी यांच्या थरारक हत्याकांडाचा पोलिसांनी छडा लावला असून, चार मुख्य आरोपींना जम्मू-काश्मीरच्या लडाख परिसरातून अटक करण्यात आली आहे. भरबाजारात फॉर्च्युनर गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी सरपंच हॅप्पी यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करून त्यांची हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण पंजाब हादरले होते.

ही हत्या वैयक्तिक वैमनस्यातून करण्यात आली होती. रूपिंदर कौर नावाच्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, सरपंच हॅप्पी तिला मदत करत असल्याने तिचा पती मनप्रीत सिंह उर्फ बबलू आणि त्याच्या कुटुंबीयांनी या हत्येचा कट रचला होता. मृताच्या वडिलांनीही आपल्या जबाबात संशय व्यक्त केला होता की, मुलगा एका विवाहित महिलेला मदत करत असल्याने तिच्या पतीने रागाच्या भरात हे पाऊल उचलले. बाघापुराणा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुख्य आरोपी मनप्रीत सिंह बबलूची ओळख पटवली आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर गुन्हेगारांचा पाठलाग सुरू केला. अखेर, हे आरोपी लडाखमध्ये आपली गाडी बिघडल्यामुळे थांबले असता, जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि आता त्यांना मोगा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

हेही वाचा : पुणे : चाकणमध्ये 32 वर्षीय महिलेवर सहा भटक्या कुत्र्यांचा हल्ला, हातापायांचे लचके तोडून कपडे फाडले, मृतदेह विवस्त्रच...

भाड्याच्या फॉर्च्युनरचा वापर आणि 15 राऊंड गोळीबार; हत्येसाठी वापरलेली अवैध शस्त्रे जप्त

डीएसपी दलबीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्याकांडासाठी आरोपींनी 'राउके कलां' गावातून एक फॉर्च्युनर गाडी भाड्याने घेतली होती. हत्येनंतर त्यांनी ही गाडी एका नातेवाईकाच्या घराबाहेर सोडून दिली आणि दुसऱ्या गाडीने लडाखच्या दिशेने पळ काढला. अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख मनप्रीत सिंह बबलू, योगेश शर्मा, हरविंदर सिंह हिंदा आणि जसनप्रीत सिंह जस्सा अशी झाली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली शस्त्रेही हस्तगत केली असून, यामध्ये मनप्रीत सिंहची एक परवानाधारक पिस्तूल आणि दोन बेकायदेशीर पिस्तूलचा समावेश आहे. या हल्ल्यात सुमारे 15 राऊंड गोळीबार करण्यात आला होता, ज्यावरून हल्लेखोरांचा क्रूर हेतू स्पष्ट होतो. विशेष म्हणजे, या संपूर्ण कटात रूपिंदर कौरची कोणतीही भूमिका नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मनप्रीत सिंहच्या कुटुंबातील इतर सदस्यांची नावेही एफआयआरमध्ये असून, त्यांच्या सहभागाबाबत पोलीस चौकशी करत आहेत. सध्या या चारही आरोपींना ट्रान्झिट रिमांडवर मोगा येथे आणले असून, त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवली जाईल, जेणेकरून या हत्येमागील सखोल कारस्थान आणि इतर सहकाऱ्यांची माहिती समोर येईल.

हे वाचलं का?

    follow whatsapp