Katrina Kaif wedding Ring: कतरिनाची एंगेजमेंट रिंग… मग चर्चा तर होणारच!, पण नेमकी किंमत किती?

मुंबई तक

जयपूर: शेवटी ती वेळ आली ज्याची सर्वजण वाट पाहत होते. कतरिना कैफ आणि विकी कौशल हे अखेर लग्न बंधनात अडकलेच.. केसात गजरा, हातात चुडा चढवलेली कतरिना कैफ ही एखाद्या राणी इतकीच आपल्या लग्नासाठी नटली-थटली होती. या खास दिवशी कतरिनाने लाल रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता. त्याचवेळी विकी कौशल देखील ऑफ व्हाइट शेरवानीमध्ये खूपच मस्त […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

जयपूर: शेवटी ती वेळ आली ज्याची सर्वजण वाट पाहत होते. कतरिना कैफ आणि विकी कौशल हे अखेर लग्न बंधनात अडकलेच.. केसात गजरा, हातात चुडा चढवलेली कतरिना कैफ ही एखाद्या राणी इतकीच आपल्या लग्नासाठी नटली-थटली होती. या खास दिवशी कतरिनाने लाल रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता. त्याचवेळी विकी कौशल देखील ऑफ व्हाइट शेरवानीमध्ये खूपच मस्त दिसत होता. मात्र या सगळ्यात आता कतरिनाच्या निळ्या-डायमंडची एंगेजमेंट रिंगची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कारण कतरिनाने परिधान केलेली ही रिंग प्रचंड महाग असल्याचं समजतं आहे.

कतरिनाची एंगेजमेंट रिंग

कतरिना आणि विकी यांनी आपलं रिलेशन अगदी गुपित ठेवलं होतं. या दोघांच्या नात्याची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा होती. पण तरीही ते त्यांनी कधीच आपल्या प्रेमाचं प्रदर्शन केलं नाही. काही दिवसांपूर्वी कतरिनाच्या एंगेजमेंटच्या बातम्याही आल्या होत्या, मात्र तिने त्याचा इन्कार केला होता. पण आता कतरिना आणि विकी हे थेट लग्नाच्या बेडीत अडकले आहे. अशावेळी कतरिनाच्या हातात एंगेजमेंट रिंगही पाहायला मिळत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp