केतकी चितळेला १८ मेपर्यंत राहावं लागणार पोलीस कोठडीत; न्यायालयात काय घडलं?

Ketaki Chitale sent to police custody : केतकी चितळेने वकील न घेता स्वतःच मांडली न्यायालयात बाजू
केतकी चितळेला १८ मेपर्यंत राहावं लागणार पोलीस कोठडीत; न्यायालयात काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणात अभिनेत्री केतकी चितळेला १८ मेपर्यंत तुरुंगात मुक्काम करावा लागणार आहे. ठाणे न्यायालयाने केतकी चितळेला १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी केतकी चितळेने वकील न घेता स्वतःच बाजू मांडली.

अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी सायंकाळी कळंबोली येथून अटक केली होती. रात्रभर पोलीस कोठडीत ठेवल्यानंतर पोलिसांनी आज केतकी चितळेला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं होतं. सुनावणीअंती न्यायालयाने केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

केतकी चितळेला १८ मेपर्यंत राहावं लागणार पोलीस कोठडीत; न्यायालयात काय घडलं?
शरद पवारांविषयी विकृत कविता पोस्ट करणारी केतकी चितळे आहे तरी कोण?

स्वतःच केला युक्तिवाद

न्यायाधीश व्ही.व्ही. राव यांच्या न्यायालयासमोर या प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी न्यायाधीशांनी 'तुमची काही तक्रार आहे का?,' असा प्रश्न विचारला. त्यावर 'नाही,' असं उत्तर केतकी चितळेने दिले.

त्यानंतर 'तुमचे कुणी वकील आहेत का?,' असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारला. त्यावर केतकी म्हणाली, 'नाही. मी जे काही बोलले आहे, तो माझा अधिकार आहे. मी जे काही पोस्ट केलं आहे, तो माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे,' असं केतकी म्हणाली.

ठाणे न्यायालयात सुनावणीवेळी केतकी चितळेने स्वतःच स्वतःचा युक्तिवाद केला. यावेळी तिने मी राजकीय व्यक्ती नसून, सामान्य व्यक्ती आहे. मी मास लीडर नाहीये की, ज्यामुळे माझ्या लिहिण्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. मी केलेली पोस्ट एक प्रतिक्रिया होती. ती पोस्ट स्वःखुशीने आणि मर्जीने केलेली आहे. लिहिण्याचं आणि बोलण्याचं स्वातंत्र्य नाही का?,' असं केतकी चितळे स्वतःचा बचाव करताना म्हणाली.

केतकी चितळेला १८ मेपर्यंत राहावं लागणार पोलीस कोठडीत; न्यायालयात काय घडलं?
Raj Thackeray : केतकी चितळेची शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका; राज ठाकरेंनी झापलं

शरद पवारांनी सातारा येथील एका कार्यक्रमात कवितेचा दाखला दिला होता. या कवितेतून देवी-देवतांबद्दल भाष्य केलेलं आहे. त्यावरून टीका होत असताना केतकीने ही पोस्ट शेअर केली होती. केतकीच्या या पोस्टमुळे मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली.

केतकी चितळेला पोलीस ताब्यात घेत असताना जमलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून तिच्यावर शाई आणि अंडीफेक करण्यात आली होती.

सुनावणी वेळी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केतकीला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. कुणाच्या सांगण्यावरून तिने ही पोस्ट केली. या मागे कोण आहे, याचा शोध घ्यायचा आहे, असं सांगत पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी दिली.

केतकी चितळेला १८ मेपर्यंत राहावं लागणार पोलीस कोठडीत; न्यायालयात काय घडलं?
'केतकी चितळेला चोप दिल्याशिवाय शांत बसणार नाही'; 'त्या' फेसबुक पोस्टवर कोण काय म्हणालं?

केतकी चितळेविरुद्ध पुण्यातही गुन्हा

शरद पवार यांच्याविरुद्ध फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी अटक केलेली असतानाच आता तिच्याविरुद्ध पुण्यातही गुन्हा दाखल झाला आहे. पुणे सायबर पोलीस आणि गोरेगाव पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे केतकीचा पोलीस कोठडीतील मुक्काम लांबण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in