करण जोहरच्या पार्टीतील हॉट ड्रेसमुळे मलायका अरोरा झाली ट्रोल…लोक म्हणतात…
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे ओळखली जाते. तिच्या ड्रेसिंगमुळे ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. फिटनेसबाबत नेहमीच जागरुक असणारी मलायका अरोरा आघाडीच्या अभिनेत्रींना ड्रेसिंगच्या बाबतीत टक्कर देते. नुकतीच मलायकानं दिग्दर्शक निर्माता करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये हजेरी लावली. यावेळच्या तिच्या लुकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. एवढंच नाही तर या लुकमुळे […]
ADVERTISEMENT

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे ओळखली जाते. तिच्या ड्रेसिंगमुळे ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. फिटनेसबाबत नेहमीच जागरुक असणारी मलायका अरोरा आघाडीच्या अभिनेत्रींना ड्रेसिंगच्या बाबतीत टक्कर देते. नुकतीच मलायकानं दिग्दर्शक निर्माता करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये हजेरी लावली. यावेळच्या तिच्या लुकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. एवढंच नाही तर या लुकमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
करण जोहरच्या बर्थडे पार्टीसाठी बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी प्रत्येजण एका पेक्षा एक ग्लॅमरस लुकमध्ये पाहायला मिळाला. पण सर्वाधिक चर्चा झाली ती मलायका अरोराच्या लुकचीच. मलायका बोल्ड अंदाजात करण जोहरच्या पार्टीला पोहोचली होती. यावेळी ती नियॉन ग्रीन कलरचं ब्लेझर आणि शॉर्ट्समध्ये दिसली. हा लुक तिने रिव्हिलिंग ब्रालेटसोबत पूर्ण केला होता. या लुकमध्ये मलायका खूपच हॉट दिसत होती.