मोठी बातमी : ऑस्कर 2027 साठी भारताकडून 'या' मराठी सिनेमाची निवड!
Gondhal Marathi Film Is India's Official Entry To Oscars 2027 : संतोष डावखर दिग्दर्शित 'गोंधळ' या मराठी सिनेमाची भारताकडून ऑस्कर 2027 साठी निवड करण्यात आलीये.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ऑस्कर 2027 साठी भारताकडून 'या' मराठी सिनेमाची निवड!
33 चित्रपटांमधून संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ची निवड
Gondhal Marathi Film Is India's Official Entry To Oscars 2027 : दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या 'गोंधळ' या मराठी सिनेमाची भारताकडून ऑस्कर 2027 साठी निवड करण्यात झाली. फिल्म फेडरेशनकडून शुक्रवारी (दि.18) ही घोषणा करण्यात आली. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या 14 सदस्यीय निवड समितीने यंदा ऑस्करसाठी शर्यतीत असलेल्या 33 चित्रपटांमधून संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ची निवड केली.
हेही वाचा : 17 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन हत्या, कुजलेली बॉडी कुत्रे खाऊ लागले, 4 आरोपी अटकेत
लोककला प्रकार चित्रपटाच्या कथानकाचा महत्त्वाचा भाग
'गोंधळ' ही नववधूची कथा आहे. तिचा प्रियकराला एका पवित्र लोकविधीचे असलेले आकर्षण सुमन एका धोकादायक खेळात बदलते. या खेळातून फसवणूक, इच्छा आणि संघर्ष समोर येतो. महाराष्ट्रातील पारंपरिक गोंधळ विधीच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा उलगडते. संगीत, नृत्य आणि पौराणिक कथांचा समावेश असलेला हा रात्रभर चालणारा लोककला प्रकार चित्रपटाच्या कथानकाचा महत्त्वाचा भाग आहे. लग्न सोहळ्यापासून सुरू होणारी कथा पुढे विश्वासघात आणि गावातील दडलेल्या तणावांच्या गडद कथेत बदलते. किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहनी, निशाद भोईर आणि अनुज प्रभू यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.
हेही वाचा : बीड : लेकीच्या शिक्षणासाठी 'माऊली' अनवाणी धावली, आता भारताच्या उपराष्ट्रपतींचा मोठा निर्णय!
