Abhijeet Sawant : सूरजला 14 लाखांच बक्षीस, मग अभिजीतने 35 लाख कसे कमावले?
Abhijeet Sawant Won Price Money : बिग बॉसमधील विजयासह सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी आणि 14.60 लाखाची बक्षीस रक्कम जिंकली आहे. यासह सूरजला इलेक्ट्रिक बाईक आणि 10 लाखांचं ज्वेलरी व्हाऊचरही देण्यात आलं आहे. त्यामुळे ही बक्षीसाची रक्कम मिळवून सूरज मालामाल झाला आहे. असं असलं तरी सूरज पेक्षा फर्स्ट रनरअप असलेला अभिजीत सावंत जास्त रक्कम कमावून गेला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अभिजीत सावंत फर्स्ट रनरअप ठरला
सूरजपेक्षा अभिजीत जास्त रक्कम कमावून गेला
अभिजीत सावंतने किती कोटी कमावले?
Abhijeet Sawant Price Money : बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वावर झापूक झुपूक करत सूरज चव्हाणने नाव कोरलं आहे. या विजयासह सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी आणि 14.60 लाखाची बक्षीस रक्कम जिंकली आहे. यासह सूरजला इलेक्ट्रिक बाईक आणि 10 लाखांचं ज्वेलरी व्हाऊचरही देण्यात आलं आहे. त्यामुळे ही बक्षीसाची रक्कम मिळवून सूरज मालामाल झाला आहे. असं असलं तरी सूरज पेक्षा फर्स्ट रनरअप असलेला अभिजीत सावंत जास्त रक्कम कमावून गेला आहे. त्यामुळे अभिजीत सावंतने नेमकी किती रक्कम कमावली आहे? हे जाणून घेऊयात. (bigg boss marathi 5 first runner up abhijeet sawant get home total remuneration and price money suraj chavan bigg boss)
ADVERTISEMENT
बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन जिंकून सूरज चव्हाणने एकूण 24.6 लाखाची बक्षीस रक्कम जिंकली आहे. पण कोईमोई डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, सूरज चव्हाणला प्रत्येक आठवड्याला 25 हजार रूपये मिळत होते. त्यानुसार बिग बॉस फायनलपर्यंत एकूण रक्कम 2.50 लाख होते. त्यामुळे जिंकल्यानंतर त्याला मिळालेली बक्षीस रक्कम त्याच्या शो फीपेक्षा 835 टक्के जास्त आहे. पण असे असले तरी अभिजीत सावंत पराभूत होऊनही लखपती ठरला आहे. कारण या शोमधून त्याची एकूण कमाई विजेत्या सूरजपेक्षा 14 टक्के जास्त आहे.
हे ही वाचा : Suraj Chavan : 14 लाखांचा चेक, बाईक आणि...बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती लाख मिळाले?
अभिजीतने किती बक्षीस रक्कम कमावली?
अभिजीत सावंत हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा फर्स्ट रनरअप ठरला होता. अभिजीत सावंतने त्याच्या गेमप्लानने प्रेक्षकांना प्रचंड खूप केले होते. फायनलमध्ये अभिजीत सावंतला 1 लाख रूपयांच गिफ्ट वाऊचर दिलं गेलं. खरं तर रनरअपसाठी बिग बॉसने कोणतीही प्राईज मनी दिली नव्हती. तरी देखील अभिजीत लखपती बनला आहे. मीडिया रिपोर्टनुसार अभिजीत सावंतला प्रत्येक आठवड्याचे 3.5 लाख मिळत होते. अशाप्रकारे फायनलपर्यंत त्याने 10 आठवड्यात 35 लाख रूपये कमावले. तसेच अभिजितची एकूण नेटवर्थ ही 1.2 ते 8 कोटी रूपये आहे. तर तो प्रत्येक परफॉर्मन्ससाठी तो 6-8 लाख रूपये घेतो, असं रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं आहे.
हे वाचलं का?
तसेच बिग बॉसमध्ये सेकंड रनरअप ठरलेली निक्की तांबोळी सर्वांधिक फी घेणारी कंटेस्टंट होती. तिला प्रत्येक आठवड्याला 3.75 लाख मिळत होते. ज्याची एकूण रक्कम 37.50 लाख रूपये होते. 10 आठवड्यात निक्की तांबोळी इतकी रक्कम घेऊन गेली. त्यामुळे रनरअप ठरून देखील या सदस्यांनी प्रचंड पैसा कमावला आहे.
हे ही वाचा : Bigg Boss 18: 'माझं एन्काउंटर होणार होतं...', पवारांचं नाव घेत सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरात उडवली खळबळ
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT