Suraj Chavan : 14 लाखांचा चेक, बाईक आणि...बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती लाख मिळाले?
Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची ट्रॉफी प्रसिद्ध रिलस्टार सूरज चव्हाणने झापूक झुपूक करत जिंकली आहे. घरातल्या सगळ्यांच सदस्यांना 'गुलीगत धोका' देऊन सूरज चव्हाणने बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. त्यामुळे सूरजच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या विजयासह सूरजवर बक्षीसांचाही वर्षाव झाला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सूरज चव्हाणने जिंकले 'इतके' लाख
अभिजीतला किती बक्षीस रक्कम मिळाली?
जान्हवी किल्लेकर शातीर ठरली
Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची ट्रॉफी प्रसिद्ध रिलस्टार सूरज चव्हाणने झापूक झुपूक करत जिंकली आहे. घरातल्या सगळ्यांच सदस्यांना 'गुलीगत धोका' देऊन सूरज चव्हाणने बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. त्यामुळे सूरजच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या विजयासह सूरजवर बक्षीसांचाही वर्षाव झाला आहे. नेमकं त्याला बिग बॉस जिंकल्यानंतर बक्षीस स्वरूपात काय काय मिळाले आहे? हे जाणून घेऊयात. (suraj chavan winner of bigg boss marathi season 5 how much prize money he get abhijit sawant)
बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर सूरजवर बक्षीसांचा वर्षाव झाला आहे. ट्रॉफी जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला बक्षीस स्वरूपात 14 लाख रूपयांचा चेक देण्यात आला आहे. त्यानंतर या कार्यक्रमाचे स्पॉन्सरर पु.ना. गाडगीळ यांच्याकडून सूरज चव्हाणला 10 लाख रूपये जाहीर करण्यात आले आहे. तसेच त्याला एक इलेक्ट्रीक बाईकही बक्षीस म्हणून देण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Mumbai Local : बाईईई हा काय प्रकार? भरगच्च गर्दीत लोकलमध्ये महिला खेळल्या गरबा; Video व्हायरल
अभिजीतने जिंकले इतके रूपये?
बिग बॉस मराठीचा रनरअप ठरलेल्या अभिजीत सावंतला पु.ना. गाडगीळ यांच्याकडून 1 लाख रूपयांचा चेक देण्यात आला आहे. तसेच इतर स्पर्धक असलेले धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी यांना प्रत्येकी एक लाख रूपये देण्यात आले आहेत.
जान्हवीने कमावले इतके लाख
टॉप 6 मध्ये पोहोचलेली जान्हवी किल्लेकर तर शातीर निघाली आहे. जान्हवीने इतर सदस्यांच्या तूलनेत बक्कळ बक्षीस रक्कम कमावली आहे. जान्हवीने अंतिम स्पर्धा सूरू व्हायच्या आधी पैसे घेऊन बाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता. ''मी उद्धट बोलले, मोठ्यांचा अपमान केला. मला माहितीये की, लोकांचा राग शांत झालेला नाहीये. हा गेम आहे आणि हा बिग बॉसने दिलेला एक टास्क आहे. टास्क पूर्ण नाही केला, तर बिग बॉस चिडतात. मी प्रायश्चित म्हणून हा बझर वाजवते आणि हा खेळ सोडते'', असे सांगत जान्हवीने 9 लाखांची पैशांची बॅग उचलून खेळातून माघार घेतली होती.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Bigg Boss Marathi 5 Grand Finale : बाईईई...हा काय प्रकार? बिग बॉसने निक्कीलाच दाखवला बाहेरचा रस्ता
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT