एग्जिट पोल

Pandharinath Kamble : बिग बॉसच्या घरातून पॅडी कांबळे एलिमिनेट होणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

bigg  boss marathi pandharinath kamble eliminated from bigg boss marathi house social media post viral
पॅडी कांबळेच्या एलिमिनेशनची एकच चर्चा
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पॅडी कांबळे घराबाहेर पडणार?

point

पॅडी कांबळेच्या एलिमिनेशची एकच चर्चा

point

सोेशल मीडियावर एलिमिनेशनची पोस्ट व्हायरल

Bigg Boss Marathi, Pandharinath Kamble : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. पुढचा आठवडा हा बिग बॉसचा शेवटचा आठवडा असणार आहे.  कारण 6 ऑक्टोबरला बिग बॉस मराठी पाचव्या सीझनचा ग्रॅड फिनाले पार पडणार आहे. तत्पुर्वी या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोणता सदस्य घराबाहेर पडणार आहे? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. असे असतानाच आता पंढरीनाथ कांबळे ऊर्फ पॅडी घराबाहेर पडणार असल्याची चर्चा सूरू झाली आहे. (bigg  boss marathi pandharinath kamble eliminated from bigg boss marathi house social media post viral) 

बिग बॉसच्या घरात गेल्या आठवड्यात नॉमिनेशन टास्क पार पडला नव्हता. याउलट बिग बॉसने घरातील सगळ्या 8 सदस्यांना नॉमिनेट केले होते. यामध्ये निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, धनंजय पवार, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगावकर आणि पंढरीनाथ कांबळे हे सदस्य या आठवड्यात घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठ नॉमिनेट होते. या सदस्यांपैकी कोणता सदस्य घराबाहेर पडणार याची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. अशात आता पंढरीनात कांबळे यांचा बिग बॉसमधील प्रवास संपला असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. 

हे ही वाचा :BB Marathi 5: अरबाजने निक्कीला दिला गुलीगत धोका! आईला भेटताच...; बिग बॉसच्या घरात घडलं तरी काय?

सोशल मीडियावर सध्या पॅडी कांबळे घराबाहेर पडल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांना पॅडी कांबळे घराबाहेर पडल्याच्या पोस्ट वाचून धक्का बसला आहे. तसेच अनेकांनी या पोस्टवर कमेंट करायला सूरूवात केली आहे. काहींनी त्याच्या खेळाचे कौतुक केले. तर काहींनी त्याच्या व्यक्तिमत्वाचेही कौतुक केले आहे. पंढरीनाथचा खेळ खूप चांगला आहे. तो युक्तीने घरात खेळत होता. पॅडीने सूरजला त्याच्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे साथ दिली. सर्वांना त्याचा मदत करण्याचा स्वभाव भावला होता. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मराठीतल्या अनेक कलाकारांनी त्याच्या खेळाचे कौतुक केले होते,तसेच त्याला पाठिंबाही जाहीर केला होता. मात्र आता पॅडी कांबळे एलिमिनेट झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र बिग बॉस अद्याप याबाबत कोणतीच घोषणा करण्यात आली नाही. बिग बॉसने साधा प्रोमो देखील टाकला नाही की कोणता सदस्य घराबाहेर पडणार आहे. 

हे ही वाचा :Dharmveer 2 Collection : 'धर्मवीर 2' ने सगळेच रेकॉर्ड मोडले, पहिल्या दिवशी जमवला 'इतक्या' कोटीचा गल्ला

बिग बॉस मराठीच्या वेळेत बदल

बिग बॉस मराठी शो तमाम प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. कलर्स मराठीवर सुरु असलेल्या बिग बॉसचं प्रेक्षकांना अक्षरक्ष: वेडच लागलं आहे. पण आता याच प्रेक्षकांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. बिग बॉस मराठीच्या फिनालेला सात दिवसांचा कालावधी बाकी आहे. पण आता बिग बॉस मराठीच्या वेळेत मोठा बदल करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. बिग बॉस मराठी आता 3 ऑक्टोबरपासून 9 ऐवजी 9.30 वाजता पाहायला मिळणार आहे. कारण कलर्स मराठी वाहिनीवर 3 ऑक्टोबरपासून 'आई तुळजाभवानी' या नव्या मालिकेचा थरार रंगणार आहे. ही मालिका 3 ऑक्टोबरपासून रात्री 9 वाजता प्ररर्शित होणार आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीची वेळ बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT