BB Marathi 5: अरबाजने निक्कीला दिला गुलीगत धोका! आईला भेटताच...; बिग बॉसच्या घरात घडलं तरी काय?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'बिग बॉस मराठी'चा 5 वा सिझन आता अंतिम टप्प्यात पोहोचला

point

निक्कीला मिळाला गुलीगत धोका!

point

 आईने नेमकं काय सांगितलं?

Nikki Tamboli : 'बिग बॉस मराठी'चा 5 वा सिझन आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. त्यामुळे स्पर्धकांमधली ही खेळी चांगलीच रंगणार आहे. गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून अरबाज पटेल नॉमिनेट होऊन बाहेर पडला. निक्की यातून स्वत:ला सावरतच होती की आता तिला गुलीगत धोका मिळाला आहे. निक्कीसोबत नेमकं काय घडलं जाणून घेऊयात. (nikki tamboli mother revealed-big thing about arbaz patel told he is engaged with his girlfriend)

'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्या दिवसापासून निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल एकत्र गेम खेळत आहेत. त्यांच्यात थोड्या कुरबुरी झाल्या पण नंतर ते पुन्हा एकत्र येऊन खेळले. निक्कीने अरबाजसोबतची तिची मैत्री मनापासून निभावली. अबरबाजनेही मैत्रीचे नाते जपले. पण आता या मैत्रीच्या नात्यात मिठाचा खडा पडणार आहे. कारण निक्कीला अरबाजबद्दलचं माहित नसलेलं मोठं सीक्रेट कळलंय जे तिच्या जिव्हारी लागलं आहे.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड, मंत्रालयात तुफान राडा करणारी ती महिला कोण?

 
बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनमध्ये सध्या फॅमिली वीक सुरू आहे. घरात सर्व सदस्यांचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी येत आहेत. यापूर्वी जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार, अभिजीत सावंत आणि वर्षा उसगावंकर यांचे कुटुंबीय घरात येऊन गेले आहेत. आजच्या (27 सप्टेंबर) एपिसोडमध्ये निक्की तांबोळीची आई घरात एन्ट्री करणार आहे. यावेळी त्या लेकीची कानउघडणी करताना दिसत आहेत. त्या निक्कीला अरबाजबद्दल मोठी गोष्ट सांगताना दिसत आहेत जी ऐकून निक्की चांगलीच संतापणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : Riya Barde: उल्हासनगरमधून अटक केलेली पॉर्न स्टार रिया बर्डे कोण? 

 निक्कीला आईने नेमकं काय सांगितलं?

'बिग बॉस' मराठीच्या 5 व्या सीझनमध्ये निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्या जोडीची जोरदार चर्चा होती. मागच्याच आठवड्यात अरबाज घराबाहेर झाला. मात्र त्यानंतर निक्कीने अरबाजच्या काही वस्तू सांभाळून ठेवल्या होत्या. ती अरबाजच्या कॉफी मग मधूनच कॉफी प्यायची. आता निक्कीची आई घरात येतेय. त्या आपल्या मुलीला अरबाजचं एक सत्य सांगतात. त्या म्हणतात, 'अरबाज चुकीचा चालला आहे. त्याने असं नाही करायला पाहिजे होतं. त्याचा साखरपुडा झालाय.' त्यावर निक्की जोरात ओरडून विचारते, कुणाचा? आई म्हणते अरबाजचा. त्यावर निक्कीच्या रागाचा पारा चांगलाच चढतो.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT