Riya Barde: उल्हासनगरमधून अटक केलेली पॉर्न स्टार रिया बर्डे कोण? 

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उल्हासनगर पोलिसांनी पॉर्न स्टार रिया बर्डेला अटक केली

point

रिया मूळची बांगलादेशी आहे.

point

प्रकरण नेमकं कसं उघडकीस आलं?

Porn star Riya Barde : उल्हासनगर पोलिसांनी पॉर्न स्टार रिया बर्डेला अटक केली आहे. भारतीय पॉर्न इंडस्ट्रीत रियाला आरोही बर्डे आणि बन्ना शेख या नावानेही ओळखले जाते. रिया बर्डे हिच्यावर बनावट कागदपत्र आणि ओळख लपवून भारतात राहत असल्याचा आरोप आहे. यामुळे तिला उल्हासनगर येथील हिल लाईन पोलिसांनी अटक केली आहे. (Who is Porn star Riya Barde turned out to be Bangladeshi arrested by Maharashtra Ulhasnagar police)

याप्रकरणी IPC 420, 465, 468, 479, 34 आणि 14 ए अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिया मूळची बांगलादेशी असून तिची आई, भाऊ आणि बहीण बनावट कागदपत्रे आणि ओळख लपवून भारतात बेकायदेशीरपणे राहत असल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार ते मूळचे बांगलादेशी असल्याची माहिती आहे. 

विशेष बाब म्हणजे बांगलादेशी असूनही रियाच्या आईने भारतीय कागदपत्रे मिळवण्यासाठी अमरावती येथील एका व्यक्तीशी लग्न केलं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : महालक्ष्मी हत्याकांडात नवा ट्विस्ट! 59 तुकडे करणाऱ्या आरोपीने घेतला गळफास, सुसाइड नोटमध्ये नेमकं काय? 

सध्या पोलिसांनी या प्रकरणात रियाव्यतिरिक्त तिची आई अंजली बर्डे उर्फ ​​रुबी शेख, वडील अरविंद बर्डे, भाऊ रवींद्र उर्फ ​​रियाज शेख आणि बहीण रितू उर्फ ​​मोनी शेख यांनाही आरोपी ठरवले आहे. हिललाईन पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेली रिया अनेक प्रोडक्शन हाऊसशी संबंधित असून तिने अनेक पॉर्न फिल्म्समध्ये काम केले होते. याशिवाय रियाला पॉर्न इंडस्ट्रीत आरोही या नावानेही ओळखले जाते.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक संग्राम मालकर यांनी सांगितले की, तपासात रियाची आई अंजली ही बांगलादेशची रहिवासी असून ती आपल्या दोन मुली रिया आणि मुलांसह भारतात अवैधरित्या राहत होती. रियाच्या आईने अमरावती येथील रहिवासी असलेल्या अरविंद बर्डे यांच्याशी विवाह केला.  तिने पश्चिम बंगालची रहिवाशी असल्याचा दावा केला आणि नंतर स्वत: आणि तिच्या मुलांसाठी बनावट जन्म प्रमाणपत्र आणि इतर बनावट कागदपत्रे बनवून भारतीय नागरिकाचा पासपोर्ट मिळवला, जेणेकरून ती तिची भारतीय ओळख सिद्ध करू शकेल. 

ADVERTISEMENT

हेही वाचा : Maharashtra weather: राज्यात पावसाचा हाहाकार! मुंबईसह 'या' जिल्ह्यांना आज हाय अलर्ट

प्रकरण नेमकं कसं उघडकीस आलं?

रियाचे आई आणि वडील दोघेही सध्या कतारमध्ये राहत असल्याचे पोलिसांना आढळून आले, तर पोलीस तिच्या भावाचा आणि बहिणीचाही शोध घेत आहेत. पोलिसांनी सांगितले की, रियाला यापूर्वी मुंबई पोलिसांनी वेश्याव्यवसायाशी संबंधित एका प्रकरणात अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायद्यांतर्गत अटक केली होती. रियाचा मित्र प्रशांत मिश्रा याला ती मूळची बांगलादेशची असून बेकायदेशीररीत्या देशात राहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. याबाबत त्याने पोलिसांकडे तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी त्यांची कागदपत्रे तपासली आणि त्यानंतरच संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT