महालक्ष्मी हत्याकांडात नवा ट्विस्ट! 59 तुकडे करणाऱ्या आरोपीने घेतला गळफास, सुसाइड नोटमध्ये नेमकं काय?
Mahalakshmi Murder Case Inside Story : श्रद्धा वालकर हत्याकांडाप्रमाणे बंगळुरूमध्ये महालक्ष्मी नावाच्या महिलेची हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते. या घटनेने हैद्राबाद हादरलं.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महालक्ष्मी हत्याकांडात नवा ट्विस्ट
59 तुकडे करणाऱ्या आरोपीने घेतला गळफास
सुसाइड नोटमध्ये नेमकं काय?
Mahalakshmi Murder Case Inside Story : श्रद्धा वालकर हत्याकांडाप्रमाणे बंगळुरूमध्ये महालक्ष्मी नावाच्या महिलेची हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते. या घटनेने हैद्राबाद हादरलं. या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. महालक्ष्मीच्या शरीराचे तब्बल 59 तुकडे आरोपीने केले होते आणि या गुन्ह्याची कबूलीसुद्धा भावाकडे दिली होती. पण आरोपीचा प्लॅन फसला आणि त्यानंतर काय घडलं सविस्तर जाणून घेऊया... (Mahalakshmi Murder Case Inside Story fridge body parts murderer mukti ranjan roy suicide body recovered revealed odisha police)
महालक्ष्मीच्या हत्येनंतर तिच्या शरीराचे एकूण 59 तुकडे करण्यात आले होते. घरातून आलेल्या दुर्गंधीमुळे महालक्ष्मीच्या हत्येची घटना उघड झाली. आज या प्रकरणात एक मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महालक्ष्मीची हत्या केल्यानंतर आरोपीने तिच्या शरीराचे तुकडे केले. आरोपीचा प्लॅन होता की ते तुकडे एका मोठ्या बॅगेत भरुन त्यांची विल्हेवाट लावण्याची. पण त्याचा प्लान फसला कारण महालक्ष्मी राहत असलेली इमारत आणि परीसर गजबलजेला असल्याने आरोपीला संधी मिळाली नाही शरीराचे तुकडे घराबाहेर नेण्याचा त्याचा प्लॅन फसला. पण इतकंच नाही. फ्रिजमध्ये आणि घरामध्ये सडणाऱ्या महालक्ष्मीच्या शरीराच्या तुकड्यांमुळे या घटनेचाच नाही तर एकूण त्याच्या या कटाचा पर्दाफाश झाला.
हेही वाचा : Maharashtra weather: राज्यात पावसाचा हाहाकार! मुंबईसह 'या' जिल्ह्यांना आज हाय अलर्ट
महालक्ष्मी बंगळुरूमध्ये राहत असताना आपल्या कुटुंबियांना शेवटचं रक्षाबंधनाच्या दिवशी भेटली. 2 सप्टेंबरला तिचं आईबरोबर फोनवरुन बोलणं झालं आणि त्यानंतर महालक्ष्मी कुटुंबातल्या कोणाच्याही संपर्कात नव्हती. त्याचबरोबर महालक्ष्मीच्या पतीने तिच्याशी 9 महिन्यांपूर्वी संबंध तोडल्याची माहिती पोलिसांना दिली आणि अशरफ नावाच्या पुरुषाबरोबर तिचे संबंध असल्याने आपण तिच्या संपर्कात नसल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी अशरफला ताब्यात घेतलं होतं आणि त्याची चौकशी केली. उत्तरखंडचा रहिवासी असलेल्या आणि बंगळुरूमध्ये हेअर ड्रेसर म्हणून काम करणाऱ्या अशरफला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी अशरफचं मोबाईल लोकेशन, त्याचे कॉल रेकॉर्डस आणि इतर काही परिस्थितीजन्य साक्षीदारांकडून (हेमंत : महालक्ष्मीचा पती) माहिती जमा केली. पण पोलिसांना अशरफ दोषी नसल्याचं आढळलं. पोलिसांनी अशरफला सोडून दिलं.
त्याच दरम्यान पोलिसांनी महालक्ष्मी राहत असलेल्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा पोलिसांना त्यामध्ये 3 संशयित आढळले. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. त्यात त्यांना महालक्ष्मीच्या हत्येचा संशय असलेल्या एकाची ओळख पटली होती. पोलीस बंगळुरूत राहणाऱ्या संशयिताच्या भावापर्यंतही पोहचले होते. पोलिसांनी टीम बनवून त्याचा शोध सुरू केला होता. पोलिसांच्या चौकशीत संशयित मुक्ती रंजन राय याने त्याच्या भावाकडे खुनाची कबूली दिल्याची माहिती आढळली. आरोपीच्या भावाने ती माहिती पोलिसांनी दिली. फोन करुन संशयिताने भावाला महालक्ष्मीची हत्या केल्याचं सांगितलं होतं. आता पोलिसांनी मुक्ती रंजन रॉयचा शोध सुरू केला. अशरफप्रमाणेच मुक्ती रंजनही हेअर ड्रेसर असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
पोलिसांनी मुक्ती रंजनचं नाव जाहीर करणं मात्र टाळलं होतं. त्यामुळे संशयित सावध होईल आणि पळून जाईल या भीतीने पोलिसांनी त्याचं घर ओडीशा आणि इतर ठिकाणी जिथे मुक्तीरंजन जाऊ शकतो अशा ठिकाणी शोध सुरू केला होता. पण मुक्तीच्या भावानेच त्याच्या आत्महत्येची माहिती पोलिसांना दिली. मुक्ती रंजन रॉयने आत्महत्या केली आहे. ओडीशाच्या भद्रकमध्ये मुक्ती रंजन रॉयने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. जिथे मुक्ती रंजन रॉयने आत्महत्या केली तिथे पोलिसांना एक बॅग, बॅगेत वही, स्कुटी मिळाली. पोलिसांना मुक्ती रंजन रॉयची एक सुसाईड नोटही मिळाली. बंगळुरू पोलिसांनी या माहितीचं ओडीशा पोलिसांबरोबर क्रॉस व्हेरिफिकेशन केलं तेव्हा आरोपी मुक्तीच्या भावाने दिलेली माहिती सत्य असल्याचं पोलिसांना आढळलं.
हेही वाचा : Horoscope In Marathi : आज 27 सप्टेंबरला 'या' राशीच्या लोकांची दिवाळीच! कुणाला मिळणार गडगंज श्रीमंती?
मुक्ती रंजन रॉयची एक सुसाईड नोटही ओडीशा पोलिसांच्या हाती लागली आहे. ज्यात मुक्तीने ओडीशा आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये लिहिलंय. महालक्ष्मीवर प्रेम होतं. पण ती वाईट वागणूक देत होती. आपण पैसे खर्च केले आणि ती तिच्याच किडनॅपिंगचा आरोप आपल्यावर करत होती. म्हणून आपण महालक्ष्मीची हत्या केल्याचं मुक्तीने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.
पोलिस मुक्ती रंजन रायला ट्रॅक करतच होते पण मुक्ती रंजनच्या हत्येनंतरच पोलिसांना त्याचा सुगावा लागला. या प्रकरणात महालक्ष्मीच्या घरुन 59 शरीराचे तुकडे आढळले. हे तुकडे पोस्टमॉर्टेमसाठी पाठविण्यात आले तेव्हा ते तुकडे पाहून पोस्टमॉर्टेम करणारेही हादरले. महालक्ष्मीच्या घरात आढळलेली ट्रॉली बॅग पोलिसांनी जप्त केली आहे. ज्यातून महालक्ष्मीच्या शरीराचे तुकडे घराबाहेर नेण्यात येणार होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT