शेतातील विहिरीत पोत्यात काहीतरी गुंडाळलेलं दिसलं, जवळ जाताच सगळे हादरले!
bihar crime news : बिहारमधील रोहतासमध्ये प्रेमविवाहाच्या दोन महिन्यांनंतर 16 वर्षीय लक्ष्मी कुमारीचा संशयास्पद मृत्यू झाला. डूमरखोह जंगलातील विहिरीत बोऱ्यात तिचा मृतदेह आढळल्यानंतर पतीसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शेतातील विहिरीत पोत्यात काहीतरी गुंडाळलेलं दिसलं
जवळ जाताच सगळे हादरले!
bihar crime news : बिहारमधील रोहतासमध्ये प्रेमविवाहाच्या अवघ्या दोन महिन्यांनंतर एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. बड्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डूमरखोह जंगलातील विहिरीत बांधलेल्या पोत्यात लक्ष्मी कुमारीचा मृतदेह आढळला. या प्रकरणी पोलिसांनी तिचा पती पिंकू बिंद आणि धनजी पासी या दोघांना अटक केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
हेही वाचा : खासदार बाळ्या मामांच्या मतदारसंघात वाहतूक कोंडीचा कहर, मुंबई-नाशिक महामार्गावर तब्बल 15 किमी ट्रॅफिक जाम!
अल्पवयीन मुलीने प्रेमविवाह केला, पण दोन महिन्यात बॉडी सापडली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगी लक्ष्मी कुमारी ही बिक्रमगंजमधील मानी गावातील मंटु राम यांची मुलगी होती. पोलिसांच्या माहितीनुसार, लक्ष्मी अल्पवयीन होती आणि तिचं वय 16 वर्षे होतं. सुमारे दोन महिन्यांपूर्वी तिचं बड्डी येथील 20 वर्षीय पिंकू बिंद याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर लक्ष्मी बड्डी परिसरात राहू लागली होती. काही काळापूर्वी ती बड्डी येथे तिच्या मावशीकडे आली होती. याच काळात तिची पिंकूशी ओळख झाली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे.
हेही वाचा : आत्महत्या करू नये म्हणून पोरगा वडिलांना सोडेना, आदित्य ठाकरेंची पाच हजारांची मदत
