Bigg Boss Marathi : निक्कीला मारहाण केल्याने आर्या घराबाहेर? बिग बॉसची कठोर शिक्षा

मुंबई तक

ADVERTISEMENT

bigg boss marathi season 5 aarya jadhav slaps nikki tamboli bigg boss today punish will arya jadhav
निक्कीला मारहाण केल्याने आर्या घराबाहेर?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

निक्कीच्या कानाखाली जाळ काढला

point

बिग बॉस आर्याला मोठी शिक्षा देणार

point

नेमकी काय शिक्षा देणार? हे आज कळणार

Bigg Boss Marathi Punish Arya Jadhav : बिग बॉस मराठीचा नवा सीझन खुपच चर्चेत आहे. या सीझनमध्ये प्रेक्षकांना तुफान राडा आणि भांडणे पाहायला मिळालं आहे.त्यात काल कँप्टन्सी टाक्स दरम्यान आर्या (Arya Jadhav) आणि निक्कीमध्ये (Nikki tamboli) तुफान राडा झालेला दिसला. इतकंच नव्हे तर आर्या (Arya Jadhav) निक्कीला ( nikki tamboli) कानशिलात लगावताना दिसली. या घटनेनंतर आता आजच्या भागात बिग बॉस आर्याला मोठी शिक्षा सुनावणार आहेत. ही शिक्षा नेमकी काय असणार आहे? हे आजच्या भागात कळणार आहे. तसेच तिला एकतर जेलमध्ये किंवा बिग बॉस घराबाहेर जाणार असल्याची चर्चा  रंगली आहे. (bigg boss marathi season 5 aarya jadhav slaps nikki tamboli bigg boss today punish will arya jadhav) 

ADVERTISEMENT

बिग बॉस मराठीमध्ये कालचा एपिसोड संपताना आपण पाहिलं की, कॅप्टनसी टास्कमध्ये सुरुवातीला निक्कीला रोखण्यासाठी आर्याने बाथरुमचा दरवाजा अडवून ठेवला होता. पुढे दोघींमध्ये झटापट झाली आणि आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. यामुळे अरबाज, वैभव, जान्हवी आणि सर्वांनीच आर्याला दोष दिला. नुकताच बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. यामध्ये घरातील मूलभुत नियमांचं उल्लंघन केल्याने बिग बॉस आर्याला मोठी शिक्षा देणार आहेत. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसलेला दिसतोय.

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : नारी शक्ती App आणि वेबसाईट झाली बंद, महिलांनी आता करायचं काय?

प्रोमोत काय? 

बिग बॉस मराठीचाा नवीन प्रोमो समोर आला आहे. आजच्या भागातील नवीन प्रोमोमध्ये बिग बॉस आर्याला शिक्षा सुनावणार असं दाखवण्यात आल आहे. प्रोमोमध्ये बिग बॉस' म्हणत आहेत, "घरात आर्या आणि निक्की यांच्यामध्ये एक निंदनीय घटना घडली. आर्या यांनी हे निंदनीय कृत्य करुन बिग बॉसच्या मुलभूत नियमांचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे बिग बॉस आर्या यांना आता शिक्षा ठोठावत आहे." त्यामुळे बिग बॉस आर्याला नेमकी काय शिक्षा सुनावतात, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

हे वाचलं का?

दरम्यान या घटनेनंतर एकाने कमेंटमध्ये लिहिलंय, "आर्या अभिनंदन तमाम महाराष्ट्राची इच्छा पूर्ण केलीस!". दुसऱ्याने म्हटलंय, "अरबाजने जान्हवीचा आणि पंढरीचा हात पिरगळला". तसेच "अभिजीतला पण जोरात धक्का दिला. त्याला पण शिक्षा झाली पाहिजे". तिसऱ्याने म्हटलंय, "आर्याला जर शिक्षा झाली तर अरबाज निक्की आणि जान्हवीला पण व्हायला पाहिजे". आणखी एकाने लिहिलंय, "जर आर्या चुकीची ठरली असेल तर, अरबाजचा पण ताबा सुटला होता. त्यानेही अभिजितला चुकीच्या पद्धतीने धक्का दिला आहे, त्याला शिक्षा करा.आम्ही काय डोळे झाकून बिग बॉस बघत नाही, नाहीतर ॲक्शन रिप्लेमध्ये आर्याची चापट दाखवा".

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : महिलांनो...'या' दिवशी योजनेचा तिसरा हप्ता खात्यात होणार जमा?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT