Ladki Bahin Yojana : नारी शक्ती App आणि वेबसाईट झाली बंद, महिलांनी आता करायचं काय?
Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत अनेक महिलांनी लाभ घेतला आहे. तर अनेक महिलांनी लाभ घेणे बाकी आहे. ज्या महिलांनी अद्याप लाभ घेतला नाही आहे, त्या महिलांना आता सप्टेंबर 30 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. पण त्याआधीच नारी शक्ती अॅप आणि लाडकी बहीण योजनेची वेबसाईट बंद झाली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महिलांना सप्टेंबर 30 पर्यंत अर्ज करता येणार
नारी शक्ती अॅप आणि लाडकी बहीण योजनेची वेबसाईट बंद
महिलांना आता अर्ज कसा करता येणार?
Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत अनेक महिलांनी लाभ घेतला आहे. तर अनेक महिलांनी लाभ घेणे बाकी आहे. ज्या महिलांनी अद्याप लाभ घेतला नाही आहे, त्या महिलांना आता सप्टेंबर 30 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. पण त्याआधीच नारी शक्ती अॅप आणि लाडकी बहीण योजनेची वेबसाईट बंद झाली आहे. त्यामुळे आता नेमकं करायचं काय? असा प्रश्न महिलांना पडला आहे. (ladki bahin yojana scheme nari shakti doot app and website closed now how to applye for scheme read full story)
ADVERTISEMENT
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोट्यवधी अर्ज आल्याने सप्टेंबर महिन्यातही अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. ऑगस्ट महिन्यात सरकारने संकेतस्थळ कार्यान्वित केले होते. तर निकषही शिथिल करण्यात आले होते. त्यामुळे अनेक महिलांनी या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज केले. परंतु, आता नारी शक्ती दूत अॅप आणि संकेतस्थळ तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महिलांनी कुठे अर्ज करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : महिलांनो...'या' दिवशी योजनेचा तिसरा हप्ता खात्यात होणार जमा?
ज्या महिला सप्टेंबर महिन्यात अर्ज करत आहेत. त्यांचा अर्ज फक्त फक्त अंगणवाडी सेविकाच भरू शकणार आहेत. नारी शक्ती अॅप आणि संकेतस्थळ बंद असल्याने जवळच्या अंगणवाडी सेविकांकडून अर्ज भरून घ्यावे लागणार आहेत. हे अधिकार आता अंगणवाडी सेविकांनाच देण्यात आले आहेत.
हे वाचलं का?
अंगणवाडी सेविका अर्ज मंजूर करणार
आता नवीन अर्ज भरणाऱ्या महिलांना अंगणवाडी सेविकांकडून अर्ज मंजूर करून घ्यावा लागणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : नुसता फॉर्म भरून पैसे मिळणार नाही, 'या' गोष्टी खूप महत्वाच्या!
आतापर्यंत इतक्या महिला ठरल्या लाभार्थी?
अशाप्रकारे आतापर्यंत राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात 1 कोटी 59 लाख भगिनींना 4787 कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारनं दिलेली आहे.हा आकडा आता सप्टेंबर महिन्यात वाढण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT