Bigg Boss Marathi : ''तुझं बाहेर लफडं असेल...'', निक्कीला असं बोलणं शोभतं?
Arbaz Patel Nikki Tamboli : बिग बॉसने रियुनियनचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये नॉमिनेट झालेले सगळे सदस्य घरात आलेले पाहायला मिळत आहेत आणि एकमेकांची भेट घेत आहेत. त्यात अरबाज मागून धावत येतो आणि निक्कीला थेट उचलून नेतो. यावेळी दोघांमध्ये नात्यावरून संवाद होते.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बिग बॉसच्या घरात आज रियुनियन होणार
अरबाज पुन्हा घरात येणार
निक्की अरबाजसोबत प्रचंड भांडली
Arbaz Patel Nikki Tamboli : बिग बॉस मराठीचा विजेता घोषित होण्यासाठी आता एक दिवस उरला आहे. तत्पुर्वी आज बिग बॉस मराठीच्या घरात रियुनियन होणार आहे. रियुनियन म्हणजे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये आतापर्यंत जितक्या स्पर्धकांनी भाग घेतला होता, ते सदस्य एकत्र येणार आहे. त्यामुळे निक्की आणि अरबाजची पुन्हा भेट होणार आहे. या भेटीत निक्की अरबाजशी प्रचंड भांडली आहे. घरात आईने दिलेल्या हिंटनंतर निक्कीने अरबाजवर सगळा राग काढला आहे. ( bigg boss marathi season 5 arbaz patel and nikki tamboli verbal fight reunion video viral on social media)
ADVERTISEMENT
बिग बॉसने रियुनियनचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये नॉमिनेट झालेले सगळे सदस्य घरात आलेले पाहायला मिळत आहेत आणि एकमेकांची भेट घेत आहेत. त्यात अरबाज मागून धावत येतो आणि निक्कीला थेट उचलून नेतो. यावेळी दोघांमध्ये नात्यावरून संवाद होते.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : बाईईई हा काय प्रकार? 4500 नंतर लगेच 3000 खात्यात होणार डिपॉझिट
प्रोमोत दाखवल्यानुसार निक्की अरबाजला म्हणते. 'तू जाताना रडला नाही, त्यामुळे मला वाटलं खरंत तुझं बाहेर लफडं असेल…त्यामुळे तुला फरक पडला नाही...' निक्कीच्या या वक्तव्यानंतर अरबाज यावर काय उत्तर देतो हे पाहणं म्हत्त्वाचं ठरणार आहे. एवढंच नाही तर, अरबाज याच्या कोटवर असलेल्या ‘बाई…’ या बॅचने देखील चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
हे वाचलं का?
दरम्यान अरबाज पटेल शोमधून नॉमिनेट झाल्यानंतर घरात एक टास्क पार पडला होता. या टास्कमध्ये सर्व सदस्यांचे कुटुंबिय बिग बॉसच्या घरात आले होते. त्याप्रमाणे निक्कीचे आई-वडील तिला भेटण्यासाठी आले होते. तेव्हा अरबाजचा साखरपुडा झाल्याचं समजलं आहे…असं निक्कीच्या आईने तिला सांगितलं होतं. यानंतर निक्की प्रचंड रागावली होती. तिने अरबाजने दिलेले सामाना त्याला पुन्हा पाठवण्याची विनंती केली होती.
हे ही वाचा : Bigg Boss Marathi 5 चा विजेता होणार मालामाल, 'इतक्या' लाखांचं मिळणार बक्षीस
दरम्यान या घटनेनंतर अरबाजने यावर स्पष्टीकरण देखील दिलं होत. 'माझा साखरपुडा झालेला नाही. शो संपल्यानंतर निक्की बाहेर येईल तेव्हा तिला सर्व काही सांगेल…'असं अरबाज म्हणाला होता. या सर्व घडामोडीनंतर आज निक्की आणि अरबाज पुन्हा एकत्र आले आहेत. त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण होते की प्रेम फुलते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT