Dharmaveer 2 : "आनंद दिघेंना बघितलं की भीती वाटायची, पण...", वाडकरांनी सांगितली आठवण

अजय परचुरे

ADVERTISEMENT

आनंद दिघे यांच्याबद्दलची सुरेश वाडकर यांनी आठवण सांगितली.
आनंद दिघे आणि गायक सुरेश वाडकर
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आनंद दिघे यांच्या आयुष्यावरील धर्मवीर २ चित्रपट लवकरच येणार भेटीला

point

धर्मवीर २ चित्रपटाचा म्युझिक लॉंच सोहळा पार पडला

point

सुरेश वाडकर यांची कार्यक्रमाला उपस्थिती

Dharmaveer 2 latest news : आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर 2 चित्रपट लवकरच चित्रपटगृहात झळकणार असून, या चित्रपटाचा म्युझिक लाँच कार्यक्रम पार पडला. गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते ठाण्यातील गडकरी रंगायतन हा सोहळा झाला. यावेळी वाडकर यांनी आनंद दिघे यांच्याबद्दलची आठवण सांगितली. (Suresh Wadkar brought to light the memories of Anand Dighe)

ADVERTISEMENT

धर्मवीर 2 या चित्रपटाची निर्मिती साहिल मोशन आर्ट्सचे मंगेश जीवन देसाई आणि झी स्टुडिओजचे  उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. 

शालेय मुलांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडला. यावेळी गुरु पौर्णिमा आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने तब्बल ४५ बाल कलाकारांनी पहिल्यांदाच  धर्मवीर चित्रपटातील  "गुरुपौर्णिमा" हे गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली.

हे वाचलं का?

सुरेश वाडकर आनंद दिघेंबद्दल काय म्हणाले?

गायक सुरेश वाडकर म्हणाले, "आनंद दिघे साहेबांना मी जवळून भेटलो आहे. त्यांच्याकडे पाहिल्यावर भीती वाटायची पण, मनातून एकदम निर्मळ होते. हा चित्रपट 98 आठवडे चालावा अशा मी शुभेच्छा देतो."

हेही वाचा >> शरद पवारांची भेट का घेतली? भुजबळांनी अखेर कारण केले उघड

"आनंद माझा" पुरस्कराची संकल्पना सांगताना निर्माते मंगेश देसाई म्हणाले, सराव परीक्षा सुरू करुन धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी शिक्षण क्षेत्रात एक महत्वपूर्ण योगदान दिले आहे. या सराव परीक्षांमुळे मुलांना असलेली  गणिताचीच नाही तर इतर विषयांची असलेली  एक प्रकारची भिती कमी करण्याचा साहेबांनी प्रयत्न केला.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Mukhyamantri Teerth Darshan Yojana : कोणाला करता येणार अर्ज? पात्रता, नियम आणि अटी काय?

यावर्षापासून अशा मुलांचा गौरव करुन दिघे साहेबांची आठवण म्हणून  प्रशस्तिपत्रक, स्मृतिचिन्ह तसेच ज्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळाले आहेत अशा विद्यार्थी - विद्यार्थिनींना धनादेशही मी देणार आहे. पुढेही हा उपक्रम मी सुरु ठेवणार असल्याचे निर्माते मंगेश जीवन देसाई यांनी सांगितले.  

ADVERTISEMENT

धर्मवीर २ चित्रपटात चार गाणी

चित्रपटात एकूण चार गाणी आहेत. गीतकार मंगेश कांगणे, स्नेहल तरडे , डॉक्टर प्रसाद बिवरे, विश्वजीत जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना अविनाश - विश्वजीत आणि चिनार-महेश यांचे सुमधुर संगीत लाभले आहे तर ही गाणी सुप्रसिद्ध गायक हरिहरन,  जावेद अली, सुखविंदर सिंग,विशाल दादलानी, आदर्श शिंदे, मनीष राजगिरे सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या आवाजात मराठी आणि हिंदी गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT