Vijay Kadam : मृत्यूशी झुंज अपयशी! ज्येष्ठ मराठी अभिनेता काळाच्या पडद्याआड
Veteran Actor Vijay Kadam : शरद तळवलकर, राजा गोसावींसारखे ज्येष्ठ विनोदी नट आदर्श असलेल्या मराठी अभिनेत्याचे पूर्ण नाव विजय दत्ताराम कदम असे होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
कर्करोगाच्या आजाराने होते त्रस्त
कर्करोगाच्या आजारातून सावरत असतानाच निधन
Actor Vijay Kadam : मराठी चित्रपटसृष्टी, मालिका तसेच रंगभूमीवर विविध भूमिका साकारणारे अभिनेते विजय कदम यांचे आज मुंबईतील राहत्या घरी दुःखद निधन झाले. नुकतेच ते कॅन्सरच्या आजारातून बरे झाले होते. मात्र आज सकाळी त्यांची तब्येत अचानक खालावली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. (veteran actor Vijay Kadam has passed away)
अभिनेते विजय कदम यांच्या पार्थिवावर शनिवारी (10 ऑगस्ट) दुपारी ओशिवरा स्मशानभूमीत अत्यंसंस्कार केले जाणार आहेत.
विजय कदम यांचा जीवनप्रवास
‘रथचक्र’, ‘टुरटूर’ यांसारख्या नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या विजय कदम यांनी १९८०च्या दशकात लहानसहान विनोदी भूमिका साकारून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली.
विजय कदम यांनी लहान असताना ‘राजा भिकारी माझी टोपी चोरली’ या बाल नाटकात हवालदाराची भूमिका करून रंगभूमीवर पदार्पण केले. त्या नंतर त्यांचा न चुकता दरवर्षी आंतरशालेय वैयक्तिक अभिनय व एकांकिका स्पर्धेत सहभाग असे.










