अभिनेत्री मौनी रॉयचं ठरलं! जानेवारीमध्ये चढणार बोहल्यावर
नागिन फेम अभिनेत्री मौनी रॉय नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच बोहल्यावर चढणार आहे. मौनी रॉयचं लग्न ठरलं असून, तिचा चुलत भाऊ विद्युत रॉयसरकार यानेच ही माहिती दिली आहे. अभिनेत्री मौनी रॉय तिचा बॉयफ्रेंड सुरज नांबियारसोबत संसार थाटणार आहे. मौनी आणि सुरज रिलेशनमध्ये आहेत. मौनी रॉय सुरजला डेट करत असल्याची चर्चाही होती. त्यानंतर आता त्यांच्या लग्नाची माहिती समोर […]
ADVERTISEMENT

नागिन फेम अभिनेत्री मौनी रॉय नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच बोहल्यावर चढणार आहे. मौनी रॉयचं लग्न ठरलं असून, तिचा चुलत भाऊ विद्युत रॉयसरकार यानेच ही माहिती दिली आहे.
अभिनेत्री मौनी रॉय तिचा बॉयफ्रेंड सुरज नांबियारसोबत संसार थाटणार आहे. मौनी आणि सुरज रिलेशनमध्ये आहेत. मौनी रॉय सुरजला डेट करत असल्याची चर्चाही होती. त्यानंतर आता त्यांच्या लग्नाची माहिती समोर आली आहे.
अभिनेत्री मौनी रॉयच्या आईने काही दिवसांपूर्वी मौनीचा बॉयफ्रेंड सुरज नांबियारची भेट घेतली. अभिनेत्री मंदिरा बेदीच्या घरी मौनीची आई सुरजला भेटल्याची माहिती समोर आली आहे.
मौनी व सुरज विवाह करणार असून, मौनीचा चुलत भाऊ विद्युत रॉयसरकारने याबाबत माहिती दिलीये. पश्चिम बंगालमधील कूच बेहारमधील एका स्थानिक वर्तमानपत्राला विद्युत रॉयसरकारने मौनीच्या लग्नाबद्दल माहिती दिली.