झोमॅटोच्या ‘त्या’ डिलीव्हरी बॉयबाबत परिणीती चोप्रा म्हणते…
सध्या संपूर्ण देशात झोमॅटोचा डिलीव्हरी बॉय आणि बंगळूरूतील महिलेने त्याच्यावर केलेले आरोप चर्चेत आहेत. दरम्यान या प्रकरणात कोणी महिलेची बाजू घेतय तर दुसरीकडे काही जणं झोमॅटोच्या डिलीव्हरी बॉयच्या कहाणीला खरं मानतायत. तर हे प्रकरण गाजत असताना बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने याविषयी आवाज उठवला आहे. यासंदर्भात अभिनेत्री परिणीती चोप्राने सोशल मीडियावर तिचं मत मांडत या प्रकरणातील […]
ADVERTISEMENT

सध्या संपूर्ण देशात झोमॅटोचा डिलीव्हरी बॉय आणि बंगळूरूतील महिलेने त्याच्यावर केलेले आरोप चर्चेत आहेत. दरम्यान या प्रकरणात कोणी महिलेची बाजू घेतय तर दुसरीकडे काही जणं झोमॅटोच्या डिलीव्हरी बॉयच्या कहाणीला खरं मानतायत. तर हे प्रकरण गाजत असताना बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने याविषयी आवाज उठवला आहे.
यासंदर्भात अभिनेत्री परिणीती चोप्राने सोशल मीडियावर तिचं मत मांडत या प्रकरणातील सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे. परिणीती तिच्या ट्विटमध्ये म्हणते, ‘झोमॅटो इंडिया – कृपया याप्रकरणातील सत्य शोधा आणि जाहीरपणे सर्वांना कळवा….जर तो माणूस निर्दोष असेल (मला विश्वास आहे की तो निर्दोष आहे) तर त्या महिलेला देखील दंड ठोठावण्यास मदत करा.. ही घटना अमानुष, शरमेची आणि हृदयद्रावक आहे.. मी यासाठी कशा प्रकारे मदत करू शकते हे कृपया मला कळवा.”