Cervical Cancer ने पूनम पांडेचा मृत्यू, नेमकं काय आहे हा आजार?

ADVERTISEMENT

Poonam Pandey cervical cancer is caused by what exactly What are the symptoms terrible disease
Poonam Pandey cervical cancer is caused by what exactly What are the symptoms terrible disease
social share
google news

Poonam Pandey: बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेचं (Poonam Pandey) ‘सर्व्हायकल कॅन्सर’ (Cervical cancer) म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगानं मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. तिच्या मॅनेजरने इंडिया टुडेला दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी सांगितले आहे की, ‘पूनम पांडे गेल्या कित्येक दिवसांपासून गंभीर आजारानं त्रस्त होती. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा भारतातील महिलांमध्ये आढळणारा कर्करोग आहे. परंतु त्याबाबत जागरुकता नसल्यामुळे त्यावर लवकर उपाय केले जात नाहीत, आणि त्यामुळे उपचारही वेळेवर होत नाहीत.

संकोचाची भावना

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या 2021 च्या अहवालानुसार, ‘भारतात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यूचे प्रमाण 11 ते 13 टक्के आहे. हे प्रमाण वैद्यकीय शास्त्रानुसार प्रचंड मोठं आहे. 2019 मध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे भारतात 45 हजार महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 2020 मध्ये ही संख्या 77 हजारपर्यंत गेली आहे. भारतात लैंगिक आजारांबाबत संकोचाची भावना असल्यामुळे हा आजार अधिक घातक बनत चालला आहे.

घातक ट्यूमर

शरीरात जेव्हा खराब पेशींच प्रमाण वाढत जाते तेव्हा त्याला कर्करोग झाल्याचे म्हटले जाते. कर्करोग हा शरीराच्या ज्या भागामध्ये प्रथम आढळतो त्याच नावाने त्याला ओळखलं जाते. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा गर्भाशयाच्या मुखात होणारा कर्करोग आहे, त्यामुळे त्याला सर्वसामान्यांच्या भाषेत त्याला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग असं म्हटलं जाते. गर्भाशयाच्या खालच्या भागात एक घातक प्रकारचा तो एक ट्यूमर आहे. तो ट्यूमर नंतर गर्भाशयाच्या खालच्या भागापासून योनीमार्गाच्या वरच्या भागापर्यंत जातो आणि तो घातक होतो.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> ‘पॉर्न पाहण्याची लागलेली सवय..’ अल्पवयीन मुलाला कसं संपवलं?, आरोपी बापानेच सांगितला घटनाक्रम!

ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) च्या संसर्गामुळे होत असतो. सर्वसामान्यांच्या भाषेत त्याला लैंगिक संक्रमित विषाणू असंही म्हटले जाते. कर्करोग तज्ज्ञांच्या मतानुसार, महिलेला ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसची लागण झाल्यानंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका कायम असतो. लैंगिक संक्रमित विषाणूमुळे असुरक्षित संभोग करणाऱ्या महिलांमध्येही गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. तीनपेक्षा जास्त मुलांना जन्म देणाऱ्या महिला आणि गर्भनिरोधक गोळ्या घेणाऱ्या महिलांमध्ये या कर्करोगाचा धोका अधिक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

‘सर्व्हायकल कॅन्सर’ची लक्षणं

प्रारंभीच्या काळात ‘सर्व्हायकल कॅन्सर’ची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत, मात्र कालांतराने त्याची गंभीर लक्षणं दिसू लागतात. पायांना सूज येणे, सेक्स करताना वेदना होणे, मासिक पाळी अनियमित होणे, जास्त रक्तस्त्राव होणे आणि लघवीला त्रास होणे ही लक्षणं दिसू लागतात, मात्र ती सामान्य आहेत असंच समजलं जाते. परंतु ही सर्व लक्षणे इतर कारणांमुळे देखील उद्भवू शकतात. त्यामुळे यावर डॉक्टरांचा सल्ला घेणं हाच त्याच्यावर महत्वाचा उपाय आहे.

ADVERTISEMENT

उपचार पद्धती

भारतात ‘सर्व्हायकल कॅन्सर’चे प्रमाण प्रचंड आहे, मात्र त्यावर वेळीच उपचार केले गेले पाहिजेत. त्यामुळे योग्य उपचारानंतर ‘सर्व्हायकल कॅन्सर’ बराही होऊ शकतो आणि त्याचे प्रमाण हे 90 टक्क्यांहून अधिक आहे. ‘सर्व्हायकल कॅन्सर’ वर अनेक प्रकारे उपचार केले जातात

ADVERTISEMENT

सर्जरी- गर्भाशयात कर्करोग जास्त पसरला नसेल, तर सर्व्हायकल कॅन्सरग्रस्त असलेला भाग ऑपरेशनद्वारे काढून टाकला जातो. त्यामुळे तो पसरण्याआधीच काढून टाकता येतो.

रेडिएशन थेरपी- या थेरपीमध्ये उच्च उर्जेचा एक्स-रे बीम वापरून कर्करोगाच्या पेशी काढून टाकल्या जातात.

केमोथेरपी- वेगवेगळ्या प्रकारची औषधं ही ड्रिपद्वारे दिली जातात. कारण झालेल्या कॅन्सरची अवस्था आणि रुग्णाच्या शारीरिक अवस्थेनुसार केमो अनेक टप्प्यात उपचार केले जातात. दोन केमो टप्प्यात15 दिवसांचे अंतर असते कारण केमो औषधांचा परिणाम आणि त्याचा काय परिणाम होतो त्यालाही त्यासाठी अवधी मिळत असतो.

‘सर्व्हायकल कॅन्सर’ रोखणं शक्य आहे?

एचपीव्ही लस, पॅप स्मीअर चाचणी आणि आधुनिक तपासणीद्वारे सर्व्हायकल कॅन्सर टाळता येत असल्याचं कर्करोग तज्ज्ञांचे मत आहे. डॉक्टरांच्या मतानुसार लसीकरणाव्यतिरिक्त सुरक्षित सेक्स आणि जीवनशैलीत बदल करून हा आजार टाळता येऊ शकतो. कॅन्सर सोसायटी ऑफ इंडियाच्या मतानुसार हा कॅन्सर झाला तर 70 ते 80 टक्के प्रकरणांमध्ये सर्व्हायकल कॅन्सर होणं हे उपचाराच्या माध्यमातून टाळता येऊ शकतं.

हे ही वाचा >> Uddhav Thackeray: ‘तुम्ही 400 पार कसे करता हेच बघतो…’, ठाकरेंनी मोदींना उघडउघड दिलं आव्हान!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT