रवीना टंडनने आनंद महिंद्रांना कॉलेज जीवनातील सांगितली ही खास आठवण; म्हणून घेणार महिंद्राची थार गाडी

'मी महिंद्रा जीप चालवून ड्रायव्हिंग शिकले आणि ती माझी कॉलेजमधील पहिली कार होती.'
Raveena tondon file image
Raveena tondon file image

रवीना टंडनला बॉलिवूडची मस्त मस्त गर्ल म्हणून ओळखले जाते. सोशल मीडियावर सक्रिय असलेली रवीना अनेकदा तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर रवीना टंडनची एक जाहिरात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रवीना क्लब महिंद्राबद्दल बोलताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी स्वतः ट्विट केले आहे.

रवीना खरेदी करणार 'थार'

जाहिरातीत रवीना टंडन क्लब महिंद्रा आणि रिसॉर्ट्सचे सदस्यत्व घेतल्याबद्दल बोलत आहे. हा व्हिडिओ ट्विट करत आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, 'मी देखील आमच्या 10% पेक्षा जास्त रिसॉर्ट्सना भेट दिली नाही हे मान्य करायला मला लाज वाटते. पण रवीना तू मला पटवून दिलेस. मी माझे बॅग पॅक करत आहे.' असं आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. उत्तरात रवीना टंडनने ट्विट केले की, 'सर, मी सदस्य होत आहे आणि नवीन थार देखील विकत घेत आहे. मी महिंद्रा जीप चालवून ड्रायव्हिंग शिकले आणि ती माझी कॉलेजमधील पहिली कार होती. आणि मी हे पुढे नेणार आहे, असं रवीना म्हणाली.

सोशल मीडियावर सक्रिय असते रवीना

रवीना टंडन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. रवीना अनेकदा तिचे वेगवेगळे लूक दाखवताना फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी पांढरा आणि गुलाबी रंगाचा एक फ्यूजन आउटफिट चर्चेत आला होता. याशिवाय ती तिच्या टीमसोबत मध्य प्रदेशातील पेंच जंगलात सुट्टी घालवण्यासाठी गेली होती. येथे रवीना सफारीवर जाताना वाइल्डलाइफ फोटोग्राफी करताना दिसली. तिने बिबट्याचे फोटोही शेअर केले होते.

KGF 2 मध्ये दिसली होती रवीना

प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं झालं तर रवीना टंडन शेवटची रॉकिंग स्टार यशच्या 'KGF Chapter 2' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने पंतप्रधान रमिका सेन यांची भूमिका साकारली होती. याशिवाय ती नेटफ्लिक्सच्या 'आरण्यक' या मालिकेतही दिसली. या मालिकेत रवीनासोबत आशुतोष राणाही होता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in