तारीख ठरली! रिचा चढ्ढा आणि अली फजल या दिवशी अडकणार लग्न बंधनात; 3 दिवस होणार ग्रँड सेलिब्रेशन

मागच्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि मिर्झापूर फेम गुड्डू भैय्या म्हणजेच अली फजल रिलेशनशिपमध्ये होते.
Richa Chadhdha and Ali Fajal
Richa Chadhdha and Ali Fajal

मागच्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि मिर्झापूर फेम गुड्डू भैय्या म्हणजेच अली फजल रिलेशनशिपमध्ये होते. आता त्यांनी लग्न बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. अखेर ती वेळ आली आहे जेव्हा दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी आपल्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. दोघेही एकमेकांसोबत आपले नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

रिचा चढ्ढा आणि अली फजल यांचं लग्न ठरलं

रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. पण आता हे जोडपे लवकरच एकमेकांचे जीवनसाथी होणार आहे. नवीन माहितीनुसार, रिचा चढ्ढा आणि अली फजल सप्टेंबरच्या शेवटी आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहेत.

30 सप्टेंबरपासून लग्न समारंभाला सुरुवात होणार आहे

ऋचा चढ्ढा आणि अली फजलचे प्री-वेडिंग फंक्शन्स 30 सप्टेंबरपासून दिल्लीत सुरू होणार आहेत. यानंतर लग्नाचे सोहळे जवळपास ३ दिवस चालतील. या जोडप्याचा मेहंदी आणि संगीत सोहळा 1 ऑक्टोबर रोजी होणार आहे. अली फजल आणि ऋचा चड्ढा 2 ऑक्टोबरला त्यांच्या मित्र आणि कुटुंबासाठी लग्नाची मेजवानी देखील आयोजित करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

या दिवशी होणार लग्न

दिल्लीतील तीन दिवसांच्या कार्यक्रमानंतर रिचा चढ्ढा आणि अली फजल मुंबईत उर्वरित विधी पार पाडतील. म्हणजे, दिल्लीत लग्नाआधीच्या कार्यक्रमानंतर, ऋचा चढ्ढा आणि अली फजल 6 ऑक्टोबरला मुंबईत सात फेरे घेऊन लग्नगाठ बांधतील. यानंतर, 7 ऑक्टोबर रोजी बॉलीवूड मित्रांसाठी या जोडप्याचे भव्य रिसेप्शन होणार आहे.

चाहते उत्साहित

रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी 2020 मध्ये घोषणा केली की ते दोघेही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत आणि एप्रिलमध्ये लग्न करणार आहेत. पण कोविड-19 मुळे दोघांनीही त्यांचे लग्न पुढे ढकलले होते. पण आता दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या आवडत्या जोडप्याला वधू-वर झाल्याचं पाहण्यासाठी ते खूप उत्साहित आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in