Rahul vaidya : “लोक फॅशन आणि ट्रेंडच्या नावाखाली लोक न्यूड फोटोही शेअर करायला लागतील”
बदलत्या काळाबरोबर लोकांच्या जीवनशैलीत अनेक बदल होत असून, खाणपानापासून ते पेहरावापर्यंत अनेक नवनव्या गोष्टी होताना दिसत आहे. विशेषतः कपड्यांच्या बाबतीत अनेक नवनवे ट्रेंड येत असून, अनेकदा सेलिब्रेटींचे वेगवेगळ्या पेहरावातील फोटो चर्चेत येतात. यावर आता गायक आणि बिग बॉस फेम राहुल वैद्यने एक ट्विट केलं आहे. फॅशन जगतात दररोज नवंनवे ट्रेंड येत आहेत. ट्रेंडी लूकच्या लाटेत […]
ADVERTISEMENT

बदलत्या काळाबरोबर लोकांच्या जीवनशैलीत अनेक बदल होत असून, खाणपानापासून ते पेहरावापर्यंत अनेक नवनव्या गोष्टी होताना दिसत आहे. विशेषतः कपड्यांच्या बाबतीत अनेक नवनवे ट्रेंड येत असून, अनेकदा सेलिब्रेटींचे वेगवेगळ्या पेहरावातील फोटो चर्चेत येतात. यावर आता गायक आणि बिग बॉस फेम राहुल वैद्यने एक ट्विट केलं आहे.
फॅशन जगतात दररोज नवंनवे ट्रेंड येत आहेत. ट्रेंडी लूकच्या लाटेत लोकांच्या वेशभूषेतही अनेक बदल होत आहेत. पण, ग्लॅमरस आणि फॅशनच्या जगात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अनेक जण मर्यादा पार करताना दिसत आहे. फॅशनच्या नावाखाली तोकडे कपडे घालण्यावरून राहुल वैद्यने मत मांडलं आहे.
राहुल वैद्य काय म्हणाला?
राहुल वैद्यने एक ट्विट केलं आहे, ज्यात त्याने कुणाचंही नाव घेतलेलं नाही. या ट्विटमध्येच त्याने तोकडे कपडे घालण्यावरून मत मांडलं आहे.