Salman Khan: 'एकदा नाही तर तीनदा डसला विषारी साप', स्वत: सलमान खानने सांगितला 'तो' भयानक प्रसंग

Salman Khan: 'एकदा नाही तर तीनदा डसला विषारी साप', स्वत: सलमान खानने सांगितला 'तो' भयानक प्रसंग
snake entered farmhouse i grabbed it to release which is bit me thrice It was kind of poisonous snake salman khan(फोटो सौजन्य: ANI)

पनवेल: बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आज (27 डिसेंबर) आपला 56 वा वाढदिवस साजरा (Salman khan birthday) करत आहे. पण वाढदिवसाच्या आदल्याच दिवशी सलमानला साप चावल्याने त्याच्या चाहत्यांची चिंता अधिकच वाढली होती. पण तात्काळ उपचार घेतल्यानंतर सलमानला रुग्णालयातून सहा तासानंतर घरी सोडण्यात आलं होतं. या सगळ्या प्रकारानंतर आज सलमानने मीडियाशी संवादही साधला आणि आपल्या फार्म हाऊसवर सापाने नेमका कसं दंश केला आणि तिथे नेमकं काय घडलं हे देखील सांगितलं.

'साप एकदा नव्हे तर तीनदा चावला..'

सलमानने फार्म हाऊसवरील घटनेबाबत बोलताना सांगितले की, 'माझ्या फार्महाऊसमध्ये साप आला होता. मी त्याला काठीच्या साहाय्याने बाहेर काढत होतो. पण तो हळूहळू माझ्या हाताच्या दिशेने पुढे सरकला. मग मी त्याला बाहेर काढण्यासाठी हाताने पकडले. पण त्यावेळी त्याने मला तीनदा चावा घेतला. हा एक प्रकारचा विषारी साप होता. साप चावल्यानंतर मला सुमारे 6 तास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण मी आता ठीक आहे.'

वाढदिवस साजरा करण्यासाठी सलमान फार्महाऊसवर

आज सलमान खानचा वाढदिवस आहे. सलमान केवळ वाढदिवस साजरा करण्यासाठी फार्महाऊसवर पोहोचला होता. जिथे त्याला सर्पदंश झाला. खरंतर, कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे सलमानने त्याचा वाढदिवस कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांसोबत फार्महाऊसवर साजरा करण्याचा निर्णय घेतला होता पण वाढदिवसाच्या एक दिवस आधी सलमानसोबत हा भीषण प्रकार घडला.

सलमानला सर्पदंश झाल्याची बातमी समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांचा काळजाचा ठोकाच चुकला. मात्र सलमानला कोणताही धोका नसल्याची बातमी समजताच त्याच्या लाखो चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आज सलमानच्या वाढदिवसानिमित्त सर्वजण त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. चाहते त्यांच्या आवडत्या स्टारचा वाढदिवस आपल्या पद्धतीने आणि उत्साहात साजरा करत आहेत.

snake entered farmhouse i grabbed it to release which is bit me thrice It was kind of poisonous snake salman khan
Salman Khan: साप चावल्यानंतर कशी आहे सलमान खानची तब्येत? जाणून घ्या हेल्थ अपडेट

नेमकं कसं आहे सलमानचं फार्म हाऊस?

सलमान खानचं पनवेलमध्ये फार्म हाऊस असून, सर्व प्रकारच्या सोयीसुविधा त्या ठिकाणी आहेत. लॉकडाउनच्या काळात सलमान खान फार्म हाऊसवर राहायला होता. या फार्म हाऊस सलमान खानची छोटी बहीण अर्पिताचं नाव आहे. अर्पिता फार्म असं नाव गेटवरच लिहिलेलं आहे.

इथे स्वतंत्र जिम आहे. त्याचबरोबर घोडस्वारीसाठी ट्रॅकही तयार केलेला आहे. फार्म हाऊसला लागूनच शेती आहे. शेतात काम करतानाचे फोटोही सलमान खान नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असतो.

फार्म हाऊस परिसरातच एक मोठी बागही आहे. त्याचबरोबर एक मोठा स्वीमिंग पूलही तयार केलेला आहे. सुटी घालवण्यासाठी सलमान खान नेहमी फार्म हाऊसवर येत असतो. वाढदिवस आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी सलमान खान फार्म हाऊस आलेला असल्याची माहिती समोर आली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in