Ashi Hi Banwa Banwi: अशी ही बनवाबनवी सिनेमाला झाली ३३ वर्ष पूर्ण,जाणून घेऊ या सिनेमाच्या भन्नाट गोष्टी
धनंजय माने इथेच राहतात का? हा माझा बायको पार्वती तुम्ही दिलेले ७० रूपये वारले हा शुध्द हलकटपणा आहे माने आता तुम्ही म्हणाल की या संवादाची आत्ता का आठवण झालीय.आता हे संवाद कशातले आहेत.. हे तुम्हांला माहित आहेच .. सुपरहिट, पोट धरून हसवणाऱ्या अशी ही बनवाबनवी सिनेमातले.. तर आज का बुवा आली या सिनेमाची आठवण तर२३ […]
ADVERTISEMENT
धनंजय माने इथेच राहतात का?
ADVERTISEMENT
हा माझा बायको पार्वती
तुम्ही दिलेले ७० रूपये वारले
हे वाचलं का?
हा शुध्द हलकटपणा आहे माने
आता तुम्ही म्हणाल की या संवादाची आत्ता का आठवण झालीय.आता हे संवाद कशातले आहेत.. हे तुम्हांला माहित आहेच .. सुपरहिट, पोट धरून हसवणाऱ्या अशी ही बनवाबनवी सिनेमातले.. तर आज का बुवा आली या सिनेमाची आठवण तर२३ सप्टेंबर १९८८ ला मराठी चित्रपटसृष्टीत एका अश्या सिनेमाचा जन्म झाला.. ज्याचं नाव होतं अशी ही बनवाबनवी .. आजच्या दिवशी महाराष्ट्रभर अशी ही बनवाबनवी हा सिनेमा रिलीज झाला… ज्याला आज बरोबर ३३ वर्ष पूर्ण झाली..आणि पुढे या सिनेमाने धमाल उडवून दिली.. धनंजय माने इथेच राहतात का? ह्याचं उत्तर जरी मिळालं नसलं तरी ते धनंजय माने इथेच राहतात का? च्या संवादांची जादू मात्र ३३ वर्षानंतरही कायम आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत अशी ही बनवाबनवी सिनेमासंबंधाच्या भन्नाट गोष्टी
ADVERTISEMENT
मराठी चित्रपटाच्या इतिहासात क्वचित एखाद्या चित्रपटाला असे भाग्य लाभले आहे. आज एवढय़ा वर्षांनंतरही मराठी प्रेक्षकांची प्रचंड पसंती या चित्रपटाला मिळते आहे. मराठी माणूस मग तो सामान्य व्यक्ती असो वा जागतिक कीर्तीचा क्रिकेटमधील देव सचिन तेंडुलकरलाही या सिनेमाचं वेड आहे. तसेच आजच्या डिजीटल युगातही अशी ही बनवाबनवी सिनेमाला नेटकऱ्यांचीही तितकीच पसंती आहे.सध्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना नेमक्या शब्दात मांडण्यासाठीही या चित्रपटातील संवाद, दृश्यं यांचाच सर्वाधिक वापर केला जातो.मराठी चित्रपटाचे सोनेरी पान असा या चित्रपटाचा उल्लेख झाला तर कोणालाही आश्चर्य वाटणार नाही.
ADVERTISEMENT
हा चित्रपट आजही आवडीने आजची पिढी पाहते. जेव्हा पुण्याच्या प्रभातला ३ रुपये स्टॉल आणि ५ रुपये बाल्कनीला तिकीट होते तेव्हा ३ कोटीचा व्यवसाय या चित्रपटाने केला. हेच गणित आज लावले तर शंभर कोटीच्या घरात पोहोचेल. विशेष म्हणजे समाजमाध्यमांच्या जमान्यातही या चित्रपटाचे गारुड मनावर आरूढ झालेले पदोपदी दिसून येते. अशी ही बनवाबनवी हा चित्रपट जवळपास सर्वानी पाहिलेला आहे तर अनेकांनी त्याची पारायणं केली आहेत. त्यामुळे चित्रपटातील प्रसंगाला अनुरूप आजच्या घडामोडींचा उल्लेख जेव्हा समाजमाध्यमांवर केला जातो तेव्हा तो लोकांना लगेच लक्षात येतो आणि त्याचा परिमाणही अधिक होतो. चित्रपटातील प्रसंगांचा असा होणारा वापर हा कदाचित जगातील सर्वाधिक वापर होणारा मराठी चित्रपट असेल. याच चित्रपटात एक दृश्य आहे. यातील नायक धनंजय माने हा बनवाबनवी करून घर मालकाकडून सत्तर रुपये उसने घेतो. हेच पैसे जेव्हा घरमालक परत मागतो तेव्हा तुम्ही दिलेले सत्तर रुपये वारले, हा त्याचा संवाद प्रचंड गाजला.
हाच संदर्भ नेटकऱ्यांनी जेव्हा केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांची नोट अचानक बंद केली तेव्हा वापरला. त्यावेळी पोस्ट झालेल्या अनेक चित्रात धनंजय माने आपल्या मालकाला सांगतो तुम्ही दिलेले ५०० रुपये वारले. याच चित्रपटातील असे अनेक प्रसंग समाजमाध्यमांवर वापरले गेले. ही या चित्रपटाच्या लोकप्रियतेचीच पावती आहे, असे म्हणता येईल.. तसंच जेव्हा पंतप्रधान मोदी इस्त्रायलच्या दौऱ्यावर गेले होते… तेव्हाही समाजमाध्यमांवर अशी ही बनवाबनवी या सिनेमाचा आधार घेऊन इस्त्रायलचे पंतप्रधान मोदींना हे औषध मानेंना द्या असा मेम प्रचंड लोकप्रिय झाला होता.
हे तर झालं मेम्सचं पण गेल्यावर्षी धनंजय माने इथेच राहतात या नावाने चक्क एक नाटकच रंगभूमीवर आलं, महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डेच या नाटकात प्रमुख भूमिकेत झळकली होती… आज ३३ वर्षानंतरही अशी ही बनवाबनवी सिनेमाची क्रेझ लोकांमध्ये कायम आहे. आणि धनंजय माने आपल्या प्रत्येकाच्या हृदयात तितकेच कायम आहेत… सचिन पिळगांवकरांनी दिग्दर्शित केलेला आणि अशोक मामा, लक्ष्मीकांत बेर्डे ,सुधीर जोशी यांच्या अप्रतिम अदाकारीमुळे गाजलेला अशी ही बनवाबनवी सिनेमा पुढची अनेक वर्ष असाच सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवेल यात शंकाच नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT