"माझे निकटचे मित्र...पडद्यावर मोठे, तितकेच मनाने सुद्धा"; नाना पाटेकरांच्या निधनाने CM फडणवीस शोकाकुल
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
माझे निकटचे मित्र...पडद्यावर मोठे, तितकेच मनाने सुद्धा
नाना पाटेकरांच्या निधनाने CM फडणवीस शोकाकुल
Nana Patekar Demise : भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. आज (8 ऑक्टोबर) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अचानक जाण्याने कलाक्षेत्रासह संपूर्ण महाराष्ट्रावर आणि देशभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
'अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, "ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी आहे. मन प्रचंड दुःखी आहे. नाना जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनाने सुद्धा मोठे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एक कालखंड दिला. त्यातून प्रामुख्याने एक राष्ट्रभक्त अशीच त्यांची प्रतिमा प्रेक्षकांना भावली. 'क्रांतिवीर' ते 'नटसम्राट' या त्यांच्या प्रवासात जो दमदार आणि कसदार अभिनयाचा पट त्यांनी उभा केला, त्याला तोड नाही. त्यामुळे अभिनेता म्हणून त्यांचे जाणे ही मोठी हानी आहे.
परखडपणा, बेधडकपणा हे स्वभावगुण त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवणारे ठरले. पण मी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यातील हळवा माणूस कायम पाहत आलो आहे. आम्ही जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले, तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी स्वतः नाना पुढे आले होते. मकरंद अनासपुरेजी आणि त्यांनी सोबत येत 'नाम फाऊंडेशन'ची स्थापना केली आणि स्वतः शिवारात जाऊन काम केले. शेतकऱ्यांसाठी मदत करणे असो, दुष्काळी कालखंडात मदतीचा हात पुढे करणे असो, नाना कायम अग्रणी राहिले. यंदाही आपण दुष्काळाचा सामना करीत असताना नाना कधीच मागे राहिले नसते, पण ते अचानक सोडून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत."
नितीन गडकरी काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, "भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. नानांचे आणि माझे अतिशय जवळचे आणि मैत्रीपूर्ण संबंध होते. आपल्या दमदार अभिनयाने पाच दशकांहून अधिक काळ नाना पाटेकर यांनी मराठी व हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
