'मला अस्वस्थ वाटू लागलंय', नाना पाटेकरांनी पहाटे मित्राला कळवलं, गोव्यात काय घडलं?
Nana Patekar death cause : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यातील मणिपाल रुग्णालयात निधन झालं. त्यांना छातीत तीव्र वेदना झाल्यानंतर वैद्यकीय पथक त्यांच्या फ्लॅटवर पोहोचलं होतं. पुढे नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नाना पाटेकर यांच्या मृत्यूचं कारण काय?
गोव्यात पहाटे काय घडलं?
Nana Patekar death cause : चित्रपटसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं आहे. नाना पाटेकर यांचे पुत्र मल्हार पाटेकर यांनी त्यांच्या वडिलांच्या निधनाची पुष्टी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील मणिपाल रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने सकाळी 5.20 वाजता नाना पाटेकर यांना मृत घोषित केलं. नाना पाटेकर यांनी पहाटे सुमारे 3 वाजता गोव्यातील एका मित्राला अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांच्या मित्राने त्यांच्या देखभाल करणाऱ्या व्यक्तीला त्यांच्याकडे पाठवलं. रुग्णालयाकडून नंतर त्यांना आणण्यासाठी रुग्णवाहिका पाठवण्यात आली.
हेही वाचा : PM मोदी रामाच्या अवतारात तर एकनाथ शिंदे चक्क हनुमानाच्या रूपात; शिवसेनेच्या सेलिब्रेशनची चर्चा!
छातीत तीव्र वेदना अन् मित्राला कळवलं
नाना पाटेकर यांना छातीत तीव्र वेदना होत होत्या. त्यानंतर वैद्यकीय पथक त्यांच्या फ्लॅटवर पोहोचलं. त्यावेळी ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. वैद्यकीय पथकाने त्यांना कार्डियाक मसाज दिला आणि रुग्णालयात नेलं. रुग्णालयात त्यांना वाचवण्यासाठी सुमारे 45 मिनिटे प्रयत्न करण्यात आले. मात्र या प्रयत्नांना यश आलं नाही. त्यानंतर मणिपाल रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने सकाळी 5.20 वाजता त्यांना मृत घोषित केलं. नाना पाटेकर हे रुग्णालयाचे रुग्ण नसल्यामुळे नियमानुसार रुग्णालयाला पोलिसांना माहिती देणं आवश्यक होतं.
हेही वाचा : काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांना दाखवला कात्रजचा घाट, राहुल गांधींना घेऊन जाणारी बसच केली पंक्चर
