दिग्दर्शक केदार शिंदेंचं 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘शुभमंगल सावधान’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मराठी दिग्दर्शक तसंच निर्माते केदार शिंदे पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकले आहेत. लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाल्याने केदार शिंदे यांनी पुन्हा एकदा त्यांनी पत्नीबरोबर पारंपरिक पद्धतीने लग्न केलं आहे. केदार शिंदे यांच्या या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.

ADVERTISEMENT

रविवारी 9 मे रोजी केदार शिंदे आणि त्यांच्या पत्नी बेला शिंदे यांच्यासोबत पुन्हा लग्नगाठ बांधली आहे. केदार यांच्या घरीच काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे. यावेळी त्यांचे जवळचे मित्र अंकुश चौधरी, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव तसंच आदेश आणि सुचित्रा बांदेकर उपस्थित होते.

केदार आणि बेला शिंदे यांचं लव्ह मॅरेज आहे. या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं होते. त्यामुळं 25 वर्षांपूर्वी लग्न झालं त्यावेळी परंपरा तसंच विधी या दोघांना अनुभवता आलं नव्हतं. म्हणून लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना तो सर्व अनुभव मिळवून द्यायचं असं कुटुंबीयांनी ठरवलं होतं. केदार यांची कन्या सना हिनं सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली.

हे वाचलं का?

कोरोनाच्या कठीण परिस्थितीमुळे या लग्न सोहळ्याला बेलाचे आई-वडील उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी बेलाचं कन्यादान केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT