बॉलिवूडमध्ये किंग खानचा दबदबा! ‘Jawan’ नंतर येणार शाहरूखचे ‘हे’ 6 धमाकेदार चित्रपट?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

After Jawan these 6 blockbuster movies of Shahrukh Khan will come
After Jawan these 6 blockbuster movies of Shahrukh Khan will come
social share
google news

संपूर्ण देशात ‘जवान’ ची क्रेझ प्रचंड पाहायला मिळत आहे. चित्रपटगृहांमधून व्हिडीओ येत आहेत, जिथे लोक ‘जिंदा बंदा’ या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. ही तुफानी क्रेझ बॉक्स ऑफिस कलेक्शनमधूनही दिसून येते. या चित्रपटाने पहिल्या चार दिइनवसांत जगभरात 500 कोटींहून अधिक कमाई केली आहे. भारतात हिंदी व्हर्जनची कमाई 250 कोटी रुपये आहे. शाहरुख खानच्या चित्रपटाला सध्या कोणताही चित्रपट टक्कर देऊ शकत नाही असं दिसतंय. पुढील दोन आठवड्यांपर्यंत त्याची कमाई सुरूच राहील. ‘पठाण’ नंतर लोक ‘जवान’ची वाट पाहत होते. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. (After Jawan these 6 blockbuster movies of Shahrukh Khan will come)

ADVERTISEMENT

आता चाहते शाहरुखच्या आगामी चित्रपटांची वाट पाहत आहेत. हे चित्रपट ‘पठाण’ आणि ‘जवान’ सारखेच दिग्गज अॅक्शन चित्रपट असतील की त्यात काही वेगळं पाहायला मिळेल? याविषयी जाणून घेऊयात.

Raju Patil : मनसे आमदाराने भाजपची उडवली खिल्ली; पाटील म्हणाले, ‘एक पीआय…’

टायगर 3

सलमान खानने ‘पठाण’मध्ये कॅमिओ केला होता. तिथे त्याचे कॅरेक्टर पठाणला (शाहरूख) रशियन सैनिकांपासून वाचवण्यासाठी येते. त्या बदल्यात पठाण, गरज पडल्यास टायगरला मदत करण्याचे आश्वासन देतो. तेच वचन पूर्ण करताना पठाण आता ‘टायगर 3’मध्ये दिसणार आहे. दोघंही कहर करताना दिसणार आहेत. ‘टायगर 3’ मधील हा एक मोठा अॅक्शन सीन असणार आहे, असं सांगितलं जात आहे.

हे वाचलं का?

डंकी

डंकी हा चित्रपट ‘पठाण’ आणि ‘जवान’ पेक्षा पूर्णपणे वेगळा असणार आहे. या चित्रपटामुळे शाहरुख त्याच्या सर्व चाहत्यांना खूश करेल. डिसेंबर 2023 मध्ये ‘डंकी’ प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. पण आता ते कठीण आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला तीन महिने उरले असून पहिले अधिकृत पोस्टर अद्याप आलेले नाही. हे शक्य आहे की निर्माते त्याची रिलीजची तारीख 2024 वर ढकलू शकतात.

जुनं वैर… नवी मैत्री! चंद्रबाबू नायडूंच्या अटकेचा मेसेज काय? वाचा राजकीय Inside Story

द आर्चीज चित्रपट

शाहरुखची मुलगी सुहानाचा पहिला चित्रपट द आर्चीज 07 डिसेंबर 2023 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर त्यांचा पुढचा चित्रपट स्पाय अॅक्शन थ्रिलर असेल. शाहरुख आणि गौरी खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट या चित्रपटासाठी पैसे गुंतवणार आहे. सुहाना गुप्तहेराच्या मुख्य भूमिकेत असेल. मात्र, या चित्रपटात शाहरुखचीही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. तो सुहानाचा हँडलर बनेल. म्हणजेच मिशनवर गेलेल्या एजंटला मदत करणारी व्यक्ती.

ADVERTISEMENT

टायगर vs पठाण

‘पठाण’च्या प्रचंड यशानंतर आदित्य चोप्राने सलमान आणि शाहरुखला एका चित्रपटात एकत्र आणण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाचे नाव ‘टायगर vs पठाण’ असे असेल. चित्रपटाची कल्पना ‘कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर’ वरून प्रेरित आहे. टायगर आणि पठाण यांच्यात काही कारणावरून मतभेद होतील. दोघंही भांडतील आणि मग शेवटी एकत्र येतील. ‘टायगर’ आणि ‘पठाण’ बनवणारा सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग 2024 च्या सुरुवातीच्या महिन्यात सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

Renu Sinha Murder : रक्ताच्या थारोळ्यात पडला होता मृतदेह, सुप्रीम कोर्टातील वकिलाची कुणी केली हत्या?

पठाण 2

शाहरुख काही काळ भव्य चित्रपट करणार आहे. हे असे चित्रपट आहेत जे गुणवत्तेच्या बाबतीत त्याचे सर्वोत्तम काम नसले तरी कमाईच्या बाबतीत ते अव्वल राहतील. ‘पठाण’ हा त्याचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. निर्माते त्याचा सिक्वेलही बनवणार आहेत. मात्र, याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

जवान 2

निर्मात्यांनी ‘जवान’च्या शेवटी एक छोटासा सीन ठेवला. तिथे शाहरुखचे पात्र आझाद त्याच्या पुढच्या मिशनबद्दल विचारतो. तेव्हा संजय दत्तचं पात्र नायक म्हणतो, ‘स्विस बँक’. अनेकांनी याला सिक्वेलचा इशारा म्हणून पाहिलं. काही मीडिया रिपोर्ट्स देखील आले आहेत, त्यानुसार अॅटलीने ‘जवान 2’ च्या कथेवर काम सुरू केलं आहे असं म्हटलं जातंय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT