अक्षय कुमारकडून 25 कोटींचा खटला दाखल, परेश रावल यांचं कायदेशीर उत्तर, हेरा-फेरी अडचणीत, प्रकरण काय?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘हेरा फेरी 3’चे हक्क अक्षय कुमारकडे असून, परेश रावल यांच्या अचानक बाहेर पडण्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

Hera Pheri Movie Controversy : कॉमेडी चित्रपट ‘हेरा फेरी’च्या तिसऱ्या भागाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली होती. चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला होता.पण परेश रावल यांनी अचानक चित्रपट सोडल्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली की, अक्षय कुमारने परेश रावल यांच्यावर 25 कोटींचा खटला दाखल केला आहे.
अक्षय कुमारने का ठोकला खटला?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘हेरा फेरी 3’चे हक्क अक्षय कुमारकडे असून, परेश रावल यांच्या अचानक बाहेर पडण्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यामुळे अक्षयने आपले सहकलाकार असलेले परेश रावल यांच्याविरोधातच कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतलाय. दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी माध्मांशी बोलताना सांगितलं की, परेश रावल यांनी चित्रपट सोडण्याची कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती. त्यामुळे अक्षयला आर्थिक आणि मानसिक नुकसान सहन करावं लागलं. प्रियदर्शन यांनी अक्षयच्या या कायदेशीर कारवाईला पूर्ण पाठिंबा दिला आहे.
परेश रावल यांचं प्रत्युत्तर
हे ही वाचा >>सख्ख्या आईसोबत मुलाचे अनैतिक संबंध, 9 वर्षाच्या मुलीने 'नको त्या अवस्थेत' पाहिलं अन् पुढे घडलं भयंकर!
या प्रकरणावर बराच काळ मौन बाळगणाऱ्या परेश रावल यांनी अखेर सोशल मीडियावर आपली बाजू मांडली. त्यांनी X वर लिहिलं, “माझे वकील अमीत नाइक यांनी माझ्या चित्रपटातून बाहेर पडण्याबाबत योग्य उत्तर पाठवलं आहे. एकदा ते उत्तर वाचल्यानंतर सर्व उत्तरं मिळतील.” याशिवाय, परेश यांनी यापूर्वी क्रिएटिव्ह डिफरन्सेसमुळे चित्रपट सोडल्याच्या अफवाही खोडून काढल्या होत्या.
बाबू रावच्या भूमिकेवर परेश रावल काय म्हणाले?
लल्लनटॉपशी बोलताना परेश रावल यांनी सांगितलं की, ‘हेरा फेरी’मधील बाबू रावच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “या भूमिकेतून मला मुक्ती हवी आहे. बाबू राव साकारताना मला दम कोंडतोय.” काही चर्चा अशाही आहेत की, परेश यांनी फीमुळे चित्रपट सोडला आहे. त्यांनी 11 लाख रुपयांचं साइनिंग अमाउंट 15% व्याजासह परत केल्याचंही सांगितलं जातंय. मात्र, चित्रपट सोडण्याचं खरे कारण काय, हे परेश रावल स्वतःच स्पष्ट करू शकतात.
हे ही वाचा >> नाश्ता, मटण, चिकन! वाल्मिक कराडला जेलमध्ये तब्बल 10 हजाराची... तुरुंगातून आलेले रंजीत कासले काय म्हणाले?
दरम्यान, ‘हेरा फेरी 3’च्या चाहत्यांसाठी हा सारा गोंधळ निराशाजनक आहे. परेश रावल यांच्या बाहेर पडण्याने आणि त्यानंतरच्या कायदेशीर वादाने चित्रपटाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता परेश यांच्या उत्तरानंतर अक्षय आणि निर्मात्यांचा पुढचा निर्णय काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.