अभिनेता अंकित मोहन साकारणार ‘बाबू’ शेठ
नुकतंच ‘बाबू’ या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. खळखळणाऱ्या समुद्रात डौलात उभ्या असलेल्या बोटीमध्ये रांगड्या शरीराच्या, ऐटीत उभ्या असलेल्या तरुणाने सर्वांचंच लक्ष वेधूलं होतं. हा तरुण नेमका कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पोस्टर पाहून पडला होता. तर आता पोस्टरमधील त्या तरुणाचं नाव समोर आलं आहे. हँडसम आणि डॅशिंग अभिनेता अंकित मोहन ‘बाबू’ या […]
ADVERTISEMENT
नुकतंच ‘बाबू’ या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. खळखळणाऱ्या समुद्रात डौलात उभ्या असलेल्या बोटीमध्ये रांगड्या शरीराच्या, ऐटीत उभ्या असलेल्या तरुणाने सर्वांचंच लक्ष वेधूलं होतं. हा तरुण नेमका कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पोस्टर पाहून पडला होता. तर आता पोस्टरमधील त्या तरुणाचं नाव समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
हँडसम आणि डॅशिंग अभिनेता अंकित मोहन ‘बाबू’ या सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. या पोस्टरमध्ये अंकितच्या लूकने अभिनेत्याबद्दल असलेली प्रेक्षकांची उत्सुकता तर कमी केली, मात्र त्याचा हा लुक पाहून आता सिनेमाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढलीये. हा सिनेमा कधी रिलीज होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
हे वाचलं का?
नुकताच या सिनेमाचा मुहूर्त मुंबईमध्ये संपन्न झाला. यावेळी या सिनेमातील अंकितच्या लूकचं नवीन पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आलं. या मुहुर्तावेळी गायत्री दातार, रुचिरा जाधव, दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे, निर्माता बाबू के. भोईर यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम हजर होती.
ADVERTISEMENT
अंकितने यापूर्वी अनेक ऐतिहासिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. शिवाय त्याने हिंदी मालिकांमध्ये भूमिका केल्या आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT