Nitin Desai : नितीन देसाईंच्या एनडी स्टुडिओबाबत सरकार मोठा निर्णय घेणार,काय म्हणाले उदय सामंत?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

art director nitin desai nd studio government will take big decision uday samant
art director nitin desai nd studio government will take big decision uday samant
social share
google news

बॉलिवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी स्व: हाताने बांधलेल्या एनडी स्टुडिओत (ND Studio) गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना 2 ऑगस्टला घडली होती. या घटनेने बॉलिवूड विश्वासाला मोठा धक्का बसला होता. नितीन देसाई यांनी कर्जबाजारीपणामुळे आणि व कर्जदारांचे पैसे परत न करता आल्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं होतं. या प्रकरणात पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर आता एनडी स्टुडिओचे काय होणार? कर्जदार कपंनी स्टुडिओ ताब्यात घेणार की सरकार घेणार? असा अनेकांना प्रश्न पडला होता. यावर आता राज्य सरकार एनडी स्टुडिओ ताब्यात घेण्याच्या तयारी करत असल्याची माहिती आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी याबाबतची प्रतिक्रिया दिली आहे. (art director nitin desai nd studio government will take big decision uday samant)

ADVERTISEMENT

नितीन देसाई (Nitin Desai)यांचा एनडी स्टुडिओ ताब्यात घेण्याबाबत सरकार पातळीवर चर्चा सुरु आहे. यावर आता उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एनडी स्टुडिओ एका मराठी कलाकाराने त्याच्या मेहनतीने उभारला आहे. त्यामुळे हा स्टुडिओ तो कंपनीच्या घशात जाण्यापेक्षा सरकार म्हणून तो सरकारच्या ताब्यात घेता येऊ शकतो, यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा : Akshay Kumar :अक्षय कुमार भारतीय झाला,आता निवडणूक लढवणार?

एनडी स्टुडिओ ताब्यात घेण्यासाठी आम्ही नितीन देसाई यांच्या कंटुंबियांशी चर्चा करणार आहोत.त्यानंतर नितीन देसाईने कर्ज घेतलेल्या फायनान्स कंपनीशीही चर्चा करणार आहोत. यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. या चर्चेत एनडी स्टुडिओ जर सरकारच्या ताब्यात राहिला तर त्यातून मोठी रोजगार निर्मिती होऊ शकते. तसेच बॉलीवूडला जी जागेच कमतरता भासत आहे, ती या स्टुडिओनिमित्त मुंबईच्या बाहेर उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे. याबाबत मी स्वतः पुढाकार घेणार असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे. आता यावर सरकार पातळीवर काय निर्णय होतो, हे य़ेणाऱ्या काळात समोर येणार आहे.

हे वाचलं का?

नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांच्या तक्रारीवरून खालापूर पोलिसांनी 4 ऑगस्ट रोजी शाह आणि बन्सल यांच्यासह एडलवाईज समुहातील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे.

हे ही वाचा : Seema haider : सीमावर चित्रपट बनवणाऱ्या अमित जानीला मनसेने का दिलीये धमकी?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT