PHOTO: प्रियांका चोप्राचा हा ड्रेस नेमका आहे तरी कसा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

प्रियांका चोप्राने तिच्या दमदार अभिनयाने जगभरातील चाहत्यांना आपलंसं केलं आहे आणि आता प्रियांका आपल्या सुपर गॉर्जियस लुक लोकांना घायाळ करत आहेत. याआधी प्रियांकाच्या शिमरी ड्रेसमधील ग्लॅमरस लुकने चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं होतं. आणि आता प्रियांकाचा आणखी एक जबरदस्त लूक समोर आला आहे.

हे वाचलं का?

प्रियांका चोप्राच्या नव्या लुकचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. पॅरिसमधून समोर आलेल्या नवीन फोटोंमध्ये प्रियांका ब्लॅक अँड व्हाइट रफल गाउनमध्ये प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.

ADVERTISEMENT

प्रियांकाच्या ब्लॅक बॉडीकॉन गाऊनवर डीप प्लंगिंग नेकलाइन रफल डिझायनिंग तिच्या लुकला एक वेगळाच टच देत आहे. या ड्रेसची रफल डिझाईन अगदी अनोखी आहे, जी लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

ADVERTISEMENT

ग्लोइंग मेकअपमुळे प्रियांकाच लूक वेगळाच दिसतो आहे. न्यूड ब्राऊन ग्लॉसी लिपस्टिक, आयलायनर, ब्लशरसह प्रियांकाने तिच्या मेकअपला अल्ट्रा ग्लॅम टच दिला आहे. प्रियांका ड्रामाटिक ड्रेससह तिचा हा मेकअप खूपच उठून दिसतोय.

ब्लॅक अँड व्हाइट रफल गाऊनमधील प्रियांका चोप्राच्या इलेक्ट्रीफायिंग लुकची सर्वत्र चर्चा आहे. सोशल मीडियावर प्रियांकाच्या फोटोंचा बोलबाला आहे. अनेक फॅन पेजवर प्रियांकाचे फोटो शेअर केले जात आहेत. प्रियांकाचा नेकपीसही चाहत्यांना आकर्षित करत आहे.

प्रियांकाचा हा लुक कोणालाही आकर्षित करेल असाच आहे. यामध्ये प्रियांका अगदी वेगळीच दिसत आहे. प्रियांकाच्या या लुकवर चाहते देखील बरेच खुश आहे.

प्रियांकाचा फॅशन सेन्स आणि स्टाइल स्टेटमेंट खरोखरच अप्रतिम आहे असेच म्हणावे लागेल. अभिनयापासून फॅशन जगतापर्यंत सर्वच बाबतीत ती आघाडीवर आहे. त्यामुळेच ती जगभरातील चाहत्यांच्या मनावर राज्य करते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT