Abhishek-Aishwarya: अभिषेक-ऐश्वर्याने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राईज! घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान नेमकं काय घडलं?
Abhishek Bachchan-Aishwarya Rai Latest News: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. सोशल मीडियावर सुरु असलेल्या या अफवांबाबत दोन्ही कुटुंबाकडून याविषयी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाहीय.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनने दिली गूड न्यूज?
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन या चित्रपटात झळकणार
घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मोठी अपडेट आली समोर
Abhishek Bachchan-Aishwarya Rai Latest News: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. सोशल मीडियावर सुरु असलेल्या या अफवांबाबत दोन्ही कुटुंबाकडून याविषयी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाहीय. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्यात ऐश्वर्या-अभिषेक एकत्र स्पॉट झाले नव्हते. तसच ऐश्वर्याच्या वाढदिवशी बच्चन कुटुंबियांनी कोणतीही पोस्ट शेअर न केल्यानं चाहत्यांकडून अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. अशातच ऐश्वर्या-अभिषेकने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.
ADVERTISEMENT
घटस्फोटाच्या चर्चा अफवा आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेकनं पुन्हा एकत्र यावं, अशा भावना त्यांचे चाहते व्यक्त करत आहेत. अशातच अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी एक चित्रपट साईन केला आहे. बॉलिवूडचे सर्वात लोकप्रीय कपल मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. निर्माते मणिरत्नम यांच्या नव्या चित्रपटात अभिषेक-ऐश्वर्याची जोडी झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे. इंटरनेटवर घटस्फोटाच्या चर्चा तुफान रंगल्या असतानाच आता दोघेही एका नवीन चित्रपटात एकत्र येणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मणिरत्नम यांच्या 'गुरु' चित्रपटासाठी ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र आल्याचं समजते.
हे ही वाचा >> Mahim Viral Video : "आमच्या दरवाज्यातून निघ...", महिलांनी सदा सरवणकरांंना थेट सुनावलं!
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. अनेक सार्वजनिक इव्हेंट्समध्येही दोघे एकत्रित स्पॉट झाल्याचं समोर येत नाही. अशातच अभिषेक बच्चन अभिनेत्री निमरत कौरसोबत डेट करत असल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. बच्चन कुटुंबातीकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाहीय.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Morning Walk: मॉर्निंग वॉक करताय? 'या 4 गोष्टी लक्षातच ठेवा', तरच आरोग्यास मिळतील जबरदस्त फायदे
ऐश्वर्या आणि अभिषेकबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी 20 एप्रिल 2007 मध्ये लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाची जगभरात चर्चा रंगली होती. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो खूप व्हायरल झाले आहेत. दोघांना अराध्या नावाची गोंडस मुलगी आहे. अराध्या तिच्या आईसोबत (ऐश्वर्या राय) नेहमीच स्पॉट होत असते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT