Mahim Viral Video : "आमच्या दरवाज्यातून निघ...", महिलांनी सदा सरवणकरांंना थेट सुनावलं!
Sada Sarvankar Rally Viral Video: राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार करण्यास सुरुवात केलीय. अशातच माहिम मतदारसंघाकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
संतापलेल्या महिलांनी सदा सरवणकरांना सुनावलं, कारण काय?
'आम्ही कोणत्या लाडक्या बहिणी?' सरवणकरांच्या रॅलीत महिलांचा आक्रोश
सदा सरवणकरांच्या रॅलीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Sada Sarvankar Rally Viral Video: राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार करण्यास सुरुवात केलीय. अशातच माहिम मतदारसंघाकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. याच मतदारसंघातून शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर अमित ठाकरेंच्या विरोधात उभे आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांनी रणशिंग फुंकल्यानं या राजकीय लढाईची रंगत आणखीनच वाढली आहे. अशातच माहिमच्या महिलांनी सदा सरवणकरांना प्रचार रॅली दरम्यान हुसकावून लावल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हायरल व्हिडीओनं राजकीय वर्तुळात खळबळ उडवून टाकली आहे.
ADVERTISEMENT
सदा सरवणकर यांच्या प्रचार रॅलीत नेमकं काय घडलं?
शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी माहिममध्ये प्रचार रॅली काढली होती. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते कोळी बांधवांच्या वस्तीत प्रचारासाठी गेले असता, तेथील स्थानिक महिलांनी सदा सरवणकर आणि पदाधिकाऱ्यांना हुसकावून लावलं. 'आम्ही लावलेला फूड स्टॉल बंद का केला?', लाडकी बहीण सांगता मग आम्ही कोणत्या लाडक्या बहीणी आहोत? असा सवाल उपस्थित करत महिलांनी शिवसेना कार्यकर्त्यांवर संताप व्यक्त केला. दरवाजून आधी बाहेर निघा, असं म्हणत या महिलांनी शिवसेना कार्यकर्त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.
हे ही वाचा >> Mumbai Crime : प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये 7 तुकडे! डोकं, हात-पाय अन्... मुंबईत भयानक कांड!
इथे पाहा व्हायरल व्हिडीओ
गेल्या काही दिवसांपासून माहिम मतदारसंघात शिवसेना, मनसे आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपांची राळ उडत आहे. अमित ठाकरे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत उभे राहिल्याने महायुतीने पाठिंबा दर्शवण्याची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु, माहिमचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने या मतदारसंघात निवडणुकीची चुरस आणखीनच वाढली. अशातच माहिम मतदारसंघात काही मतदार सदा सरवणकर यांच्यावर प्रचंड नाराज असल्याचं या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. त्यामुळे माहिममध्ये अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यात जोरदार राजकीय लढाई होईल, अशी चर्चा आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासयला आलेल्या अधिकाऱ्यांवर बरसले, ठाकरेंनी स्वत: व्हिडीओ घेतला
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT