Gautami Patil: गौतमीच्या कार्यक्रमात तुफान राडा, खुर्च्याची तोडफोड; नेमकं काय घडलं?

योगेश पांडे

ADVERTISEMENT

chaos at gautami patil lavani event in nagpur police had to use mild force audience vandalized chairs
chaos at gautami patil lavani event in nagpur police had to use mild force audience vandalized chairs
social share
google news

Gautami Patil Lavani Event: नागपूर: महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिचा लावणी महोत्सव नागपुरात (Nagpur) शुक्रवारी (29 सप्टेंबर) रात्री पार पडला. यावेळी गौतमीला पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. पण ही गर्दी खूप मोठ्या प्रमाणात असल्याने कार्यक्रमावेळी काही जणांनी हुल्लडबाजी देखील केली. त्यामुळे अशा हुल्लडबाजांना हाताळण्यासाठी नागपूर पोलिसांना सौम्य बळाचा वापर देखील करावा लागला. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या काही हुल्लडबाजांनी तेथील खुर्च्यांची तोडफोड केली. त्यामुळे बराच गदारोळ झाला. बसण्यासाठी योग्य व्यवस्था न केल्यामुळे हा गोंधळ झाला असल्याचं म्हणत खुर्च्यांची तोडफोडही केली. (chaos at gautami patil lavani event in nagpur police had to use mild force audience vandalized chairs)

ADVERTISEMENT

माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश गजभिये यांनी आयोजित केलेल्या नागपुरातील रामनगर येथील एकता गणेश सार्वजनिक मंडळाच्या परिसरात हा सर्व प्रकार घडला.

हे ही वाचा >> ‘महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या…’, गौतमी पाटीलवर संभाजी राजेंचा यू-टर्न!

गणेशोत्सवनिमित्त प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, गौतमी पाटील हिने मंचावर नृत्य करण्यास सुरुवात करताच जमलेल्या लोकांनी तिला पाहण्यासाठी एकच रेटारेटी सुरू केली. यावेळी काही तरुण हे जरा जास्तच आक्रमक झाले आणि त्यांनी खुर्च्यांची तोडफोडच सुरू केली. त्यामुळे उपस्थित पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला आणि कार्यक्रम वेळेपूर्वीच आटोपता घ्यावा लागला.

हे वाचलं का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Tak (@mumbaitak)

कोल्हापुरात गौतमीच्या कार्यक्रमांवर बंदी, फक्त…

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वीच गौतमी पाटीलच्या कोल्हापुरातील कार्यक्रमावर पोलिसांवरच बंदी घालण्यात आली होती. कोल्हापूर जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. उत्सव काळात विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून देखावे तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Gautami Patil: ‘तू होतीस का माझी परी..’, गौतमी पाटीलला कोणी घातली थेट लग्नाची मागणी?

विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात गौतमी पाटील हिच्या शोचं आयोजन केलं जातं. कोल्हापूर जिल्ह्यातील इस्पुर्ली आणि राशिवडे इथं देखील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली गेली होती.

ADVERTISEMENT

‘गणेशोत्सव काळात पोलिसांवर बंदोबस्ताचा प्रचंड ताण असतो. या काळात जर गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवल्यास प्रचंड गर्दी होईल. त्यामुळं कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमासाठी पोलीस बंदोबस्त देणं शक्य होणार नाही.’ असं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं होतं.

त्यामुळं गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यास उत्सुक असलेल्या संयोजकांचा हिरमोड झाला होता. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरुन, पोलीस अधीक्षकांनी हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT