‘बारमधील डान्स तुम्ही स्टेजवर घेऊन येता’, दिपाली सय्यदच्या बोलण्याने राधा पाटील भावुक, म्हणाली..VIDEO

मुंबई तक

Dipali Sayyed and Radha Patil Marathi Big Boss Season 6 : कलर्स मराठीने दोघींमधील वादाचा एक प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. यामध्ये दिपाली सय्यद सध्याच्या लावणी करण्याच्या पद्धतीवर बोलताना पाहायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे राधा पाटील दिपाली सय्यदने केलेल्या टिप्पणीमुळे भावुक झालीये. तिने तिला जोरदार प्रत्युत्तरही दिलंय. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात... 

ADVERTISEMENT

Dipali sayyad and Randha Patil
Dipali sayyad and Randha Patil
social share
google news

बातम्या हायलाइट

point

‘बारमधील डान्स तुम्ही स्टेजवर घेऊन येता’

point

दिपाली सय्यदच्या बोलण्याने राधा पाटील भावुक, म्हणाली..VIDEO

Dipali Sayyed and Radha Patil Marathi Big Boss Season 6 :  बिग बॉस मराठीच्या 6 व्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली असून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अनेक रीलस्टार यामध्ये सहभागी झाले आहेत. दरम्यान,  या सिझनमधील स्पर्धक असलेली अभिनेत्री दिपाली सय्यद आणि नृत्यांगणा राधा पाटील यांच्यामध्ये सुरुवातीलाच वादावादी झालेली पाहायला मिळत आहे. कलर्स मराठीने दोघींमधील वादाचा एक प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. यामध्ये दिपाली सय्यद सध्याच्या लावणी करण्याच्या पद्धतीवर बोलताना पाहायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे राधा पाटील दिपाली सय्यदने केलेल्या टिप्पणीमुळे भावुक झालीये. तिने दिपालीला जोरदार प्रत्युत्तरही दिलंय. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात... 

दोघींमध्ये नेमका काय संवाद झाला? 

"लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान म्हणतो आपण... त्याला तुम्ही चीप करुन टाकलंय. बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता", ही टिप्पणी अभिनेत्री दिपाली सय्यदने बिग बॉसच्या घरात केली. त्यानंतर नृत्यांगणा राधा पाटील भावुक झाली आणि आक्रमकपणे बोलतानाही पाहायला मिळाली. दिपालीला प्रत्युत्तर  राधा पाटीलने देखील इशारा दिला. "दिपाली ताई मला लावणीवरुन मला बोलत आहेत. मी पण लायकी काढू शकते", असं राधा पाटील म्हणाली.

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

हे वाचलं का?

    follow whatsapp