‘या’ मराठी कलाकारांची खरी आडनावं तुम्हाला माहितीये का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नावात काय आहे? शेक्सपियरचं हे वाक्य जगप्रसिद्ध असलं तरी सिनेसृष्टीत मात्र असं मुळातच नाही.. नावातच सर्व काही असल्याचं पाहायला मिळत आहे. रविवारी बिग बॉस १५ ची विजेती ठरली ती मराठमोळी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश.. मात्र तिचं पूर्ण नाव आहे. तेजस्वी प्रकाश वायंगणकर… त्याचप्रमाणे मराठी सिनेसृष्टीतही अनेक कलाकार असे आहेत की ज्यांनी त्यांच्या नावापुढे आपलं आडनाव लावलेलं नाही सिनेसृष्टीत सध्या हा ‘शॉर्टकट’ नावाचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. पाहूयात अशाच काही कलाकारांची आडनावं.

ADVERTISEMENT

अमृता सुभाष – मराठीतील गुणी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. अमृता सुभाषच्या मराठी,हिंदी आणि इतर अनेक भाषातील भूमिका खूपच गाजल्या.. मात्र तिचं पूर्ण नाव आहे. अमृता सुभाष कुलकर्णी…

रसिका सुनील – माझ्या नव-याची बायको या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली रसिका सुनील हिला सगळेच ओळखतात. तिच्या नावातील सुनील हे तिच्या वडिलांचे नाव आहे. तिचे पूर्ण नाव रसिका सुनील धाबडगावकर असे आहे. एवढे मोठे आडनाव न लावता रसिकाने रसिका सुनील असे सुटसुटीत नाव स्वीकारले.

हे वाचलं का?

सायली संजीव – गोड चेह-याची ‘काहे दिया परदेस’ फेम सायली संजीव ही सुद्धा आपल्या नावापुढे फक्त वडिलांचे नाव लावते. सायली संजीव चांदसारकर असे तिचे पूर्ण नाव आहे.

ललित प्रभाकर – ‘जुळून येती रेशीमगाठी’ फेम ललित प्रभाकर याचे पूर्ण नाव काय? तर ललित प्रभाकर भदाणे. भदाणे हे आडनाव न लावता ललितने ललित प्रभाकर हे नाव स्वीकारले.

ADVERTISEMENT

प्रृथ्वीक प्रताप – महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमुळे घराघरात पोहचलेला विनोदी अभिनेता म्हणजे पृथ्वीक प्रताप.. पृथ्वीकही काम करताना आपल्या वडिलांचं नाव लावतो.. मात्र त्याचं पूर्ण नाव आहे. पृथ्वीक प्रताप कांबळे

ADVERTISEMENT

या नवीन ताज्या दमाच्या कलाकारांबरोबरच काही ज्येष्ठ कलाकारांनी ही त्यांच्या काळात आपल्या नावात शाँर्टकर्ट वापरला होता…

यातलं पहिलं नाव आहे. अभिनेत्री रंजना यांचं.. रंजना यांचं मराठी सिनेसृष्टीतील स्थान अतिशय महत्वाचं आहे. त्यांच्या अनेक भूमिका अजरामर झालेल्या आहेत. पण त्यांनीही कधीच आपलं आडनाव लावलं नव्हतं.. मात्र अभिनेत्री रंजना यांचं पूर्ण नाव होतं रंजना देशमुख

भाग्यश्री – ‘मैने प्यार किया’ या ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे एका रात्रीत स्टार झालेली भाग्यश्रीचे खरे नाव आहे भाग्यश्री पटवर्धन. सांगलीच्या पटवर्धन राजघराण्याची वंशज असलेल्या भाग्यश्रीचे लग्नानंतर नाव भाग्यश्री दासानी असे आहे.

जयश्री टी – 1958 साली गुंज उठी शहनाई या चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात करणाऱ्या अभिनेत्री जयश्री 1960 च्या दशकात अनेक चित्रपटांत भूमिका साकारल्या. जयश्री या त्यांच्या नावापुढे केवळ त्यांच्या आडनावाचे टी हे अक्षर लावतात. त्यांचे पूर्ण नाव जयश्री तळपदे असे आहे. त्यांनी 1989 साली चित्रपट दिग्दर्शक जयप्रकाश कर्नाटकी यांच्यासोबत लग्न केले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT