Kranti Redkar: समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरबद्दल तुम्हांला या गोष्टी माहिती आहेत का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर सध्या तुफान चर्चेत आहे. कॉडिलिया क्रूझवरच्या ड्रग्ज पार्टीत एनसीबीने आर्यन खानला अटक केली. एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली होती. आता सध्या आर्यन खानला जामिन मिळाला आहे. मात्र या सर्व प्रकरणात नवाब मलिकांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांवर आरोप केले आहेत. ज्याला क्रांती रेडकरने सडेतोड उत्तरंही दिली आहेत.. या सर्व गोष्टीमुळे क्रांती आता सध्या चर्चेत आहे. पण क्रांती रेडकर नेमकी कोण आहे हे जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

१७ ऑगस्ट १९८२ ला मुंबईत क्रांतीचा जन्म झाला. मुंबईत लहानाच्या मोठ्या झालेल्या क्रांतीने मुंबईतील रूईया कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. कॉलेज जीवनात असतानाच क्रांतीला मराठी चित्रपटसृष्टी खुणावू लागली होती.२००० साली क्रांती रेडकरने सून असावी या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर क्रांतीने जत्रा, ऑन ड्युटी २४ तास ,माझा नवरा तुझी बायको,नो एन्ट्री पुढे धोका आहे, शिक्षणाचा आयचा घो,फक्त लढ म्हणा, मर्डर मेस्त्री या सिनेमात काम केलं. मात्र क्रांतीला खरी ओळख मिळाली ती जत्रा या सिनेमातील कोंबडी पळाली या गाण्यामुळे. हे गाणं इतकं गाजलं की क्रांती घराघरात जाऊन पोहचली

हे वाचलं का?

२००३ मध्ये बॉलिवूडमध्ये आलेल्या गंगाजल सिनेमात क्रांती रेडकर झळकली. या सिनेमातील तिच्या कामाचंही बरंच कौतुक झालं होतं. यानंतर क्रांती दिग्दर्शनाकडे वळली आणि तिने मराठीत काकण हा सिनेमा दिग्दर्शित केला. समीक्षकांनी तिच्या या सिनेमाचंही बरंच कौतुक केलं होतं.काही वर्षांपूर्वी क्रांती रेडकरचं नाव गाजलं होतं एका वृत्तवाहिनीमुळे आयपील मँच फिक्सींग प्रकरणात तीचं नाव आलं होतं. पुढे या वृत्तवाहिनीविरोधात क्रांती रेडकरने मानहानीचा खटलाही दाखल केला होता.

ADVERTISEMENT

क्रांती रेडकरने २०१७ साली कोणालाही कळू न देता..समीर वानखेडे यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर क्रांती चित्रपटसृष्टीपासून थोडी दूर गेली. क्रांती आणि समीर वानखेंडेंना जुळ्या मुली आहेत. आपल्या सोशल मिडियावरून क्रांती नेहमीच अनेक पोस्ट करत असते. याचबरोबर क्रांतीचा कपड्यांचाही व्यवसाय आहे. झिया झायदा असं क्रांतीच्या ब्रँण्डचं नाव आहे. यासोबत क्रांतीने क्रँकर हा ज्वेलरी ब्रँडसुध्दा लॉंच केला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT