Video : "मला सरकार आणि दाऊद इब्राहिम घाबरतो ...",Bigg Boss च्या घरात गुणरत्न सदावर्ते का भडकले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

 Gunratna Sadavarte On Maharashtra Government
Gunratna Sadavarte On Dawood Ibrahim
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बिग बॉसच्या घरात गुणरत्न सदावर्ते चवताळले, कारण काय?

point

गुणरत्न सदावर्तेंच्या बिग बॉसच्या घरातील 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल

point

मला दाऊद इब्राहिम घाबरतो...असं सदावर्ते का म्हणाले?

Bigg Boss 18 Gunratna Sadavarte Viral Video : बिग बॉस 18 सुरु झाल्यापासून शोमध्ये खूप मेजदार किस्से पाहायला मिळत आहेत. पहिल्याच दिवशी व्हायरल भाभी हेमा शर्मा आणि तजिंदर पाल सिंग बग्गाला तुरुंगात टाकलं गेलं. त्यानंतर नॉमिनेशनच्या फेरित एकमेकांवर टीका-टीपण्णी करण्यात आली. पण बिग बॉसच्या घरात गेल्या काही दिवसांपासून एका सदस्याची तुफान चर्चा रंगली आहे. त्या सदस्याचं नाव आहे वकील गुणरत्न सदावर्ते. कारण त्यांनी बिग बॉसने दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. मला सरकार, दाऊद इब्राहिम घाबरतो, असं खळबळजनक विधान सदावर्ते यांनी केलं आहे. सदावर्तें बिग बॉसच्या घरात असं का म्हणाले? जाणून घेऊयात. (Bigg Boss 18 Gunratna Sadavarte Viral Video : Ever since the start of Bigg Boss 18, the show has been seeing a lot of funny stories. Viral Bhabhi Hema Sharma and Tajinder Pal Singh Bagga were jailed on the very first day)

ADVERTISEMENT

मागील एपिसोड्समध्ये पाहिलंत की, बिग बॉसने सर्व स्पर्धकांना लिव्हिंग हॉलमध्ये बोलावून एक मोठा निर्णय घेतला. घरातील सदस्यांच्या मागणीनुसार बिग बॉसने हेमा शर्मा आणि तजिंदर पाल सिंग बग्गाला तुरुंगातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी म्हटलंय की, जेल कधीच रिकामं राहू शकत नाही. यासाठी त्यांनी अविनाश मिश्रा, इशा सिंग आणि करणवीर मेहराला एका सदस्याचं नाव घ्यायला सांगितलं, ज्याला ते जेमध्ये टाकू शकतात.

जेलमध्ये जाण्यावरून भडकले गुणरत्न सदावर्ते

आपापसातील सहमीनंतर करणवीरने गुणरत्न सदावर्तेंचा नाव घेतला. सदावर्ते म्हणाले, मला या निर्णय मंजूर नाही. मी जाणार नाही. मी आताच गेम क्विट करेल. प्रश्न त्रास देण्याचा नाही, तर भूमिकेचा आहे. कोर्टात आम्ही अशीच भूमिका घेतो. मी राष्ट्रीय टीव्हीवर अन्न आणि पाण्याचा त्याग केला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Bhanudas Murkute: महिलेवर अत्याचार करणाऱ्या माजी आमदारचा 'तो' फोटो का होतोय Viral.. काय आहे कहाणी?

"मला सरकार, दाऊद इब्राहिम घाबरतो"

गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया ऐकल्यावर बिग बॉस नाराज होतात. मी माझा निर्णय सांगितलेला आहे, असं ते म्हणतात. यावर सदावर्ते म्हणतात, मी जेलमध्ये जाणं मंजूर नाही. यावेळी इतर सदस्य त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा सदावर्ते ओरडून म्हणतात, मी जाणार नाही. मला सरकार घाबरतं. मला दाऊद इब्राहीम घाबरतो. 

बिग बॉसचा काय असेल निर्णय?

गुणरत्न सदावर्ते सर्वोच्च न्यायालयाचे वकील आहेत. ज्यांनी एक सदस्य म्हणून बिग बॉसमध्ये एन्ट्री घेतली आहे. शो मध्ये त्यांच्या भूमिकेमुळं चाहत्यांचं मनोरंजन होतं. ते घरातील सदस्यांना हसत हसत मनोरंजीत करत असतात. आता बिग बॉस त्यांच्या या वागणुकीला स्वीकारतात की त्यांच्याविरोधात निर्णय सुनावतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Crime : तृतीयपंथीयाची निर्घृण हत्या! गळा चिरून मृतदेह विहिरीत टाकला, पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT