Bhanudas Murkute: महिलेवर अत्याचार करणाऱ्या माजी आमदारचा 'तो' फोटो का होतोय Viral.. काय आहे कहाणी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

माजी आमदार भानुदास मुरकुटे (फोटो सौजन्य- गोपाळ शेट्टी)
Bhanudas Murkute (Photo Credit-Gopal Shetty)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भानुदास मुरकुटेंच्या 'त्या' फोटोची कहाणी...

point

महिला छेडछाड प्रकरणी आंदोलन करणाऱ्या मुरकुटेंना महिला अत्याचारविरोधात अटक 

point

कोण आहेत भानुदास मुरकुटे? 

Former Mla Bhanudas Murkute Viral Photo : श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे (वय 82 वर्ष) यांना एका महिलेवर मागील 5 वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मुरकुटे यांच्या शेतातच काम करणाऱ्या महिलेने त्यांच्याविरोधात ही तक्रार दिल्यानंतर राहुरी पोलिसांनी मुरकुटेंना अटक केली. त्यांच्या अटकेच्या बातमीने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. असं असताना आता भानुदास मुरकुटे यांचा एक जुना फोटो हा प्रचंड व्हायरल होत आहे. जाणून घ्या या फोटोची नेमकी कहाणी काय. (Shocking information has come to light regarding former MLA Bhanudas Murkute of Srirampur in Ahilyanagar district)

महिला अत्याचार प्रकरणी न्यायालयाने मुरकुटे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अशातच मुरकुटे यांचा विधानभवनातील एक जुना फोटो हा बराच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भानुदास मुरकुटे हे हातात दारुची बाटली आणि बांगड्या घेऊन विधानभवन परिसरात आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा फोटो 1984 सालातील असून तो ब्लॅक अँड व्हाइट आहे. पण आता मुरकुटे यांच्या अटकेनंतर हाच फोटो का व्हायरल होतोय याची नेमकी कहाणी आपल्याला सांगणार आहोत. 

भानुदास मुरकुटेंच्या 'त्या' फोटोची कहाणी...

राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री रामराव आदिक यांनी दारुच्या नशेत एअर होस्टेस आणि अन्य एका महिलेशी अश्लील चाळे केल्याचा आरोप  यांच्यावर करण्यात आला होता. रामराव आदिक हे जर्मनीच्या दौऱ्यावर गेलेले असताना हा धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याबाबतचं वृत्त हे टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात देखील छापून आलं होतं. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Crime : तृतीयपंथीयाची निर्घृण हत्या! गळा चिरून मृतदेह विहिरीत टाकला, पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...

ज्यानंतर त्यावेळी आमदार असलेल्या भानुदास मुरुकुटे यांनी रामराव आदिक यांच्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत थेट विधानभवन परिसरात आंदोलन केलं होतं. यावेळी मुरकुटे हे हातात दारुची बाटली आणि बांगड्या घेऊन विधानभवन परिसरात आले होते. मुरकुटे यांच्या आंदोलनामुळे रामराव आदिक हे अधिकच अडचणीत आले होते.

या सगळ्या घडामोडीमुळे हे प्रकरण अधिकच तापलं. तेव्हा अनेक वृत्तपत्रांनी या प्रकरणी बातम्यांची मालिकाच सुरू केली. त्यावर अग्रलेख छापून येऊ लागले. त्यामुळे राज्यातील वसंतदादा पाटील सरकार हे बरंच अडचणीत आलं, त्यांच्यावर बरीच टीकाही झाली. अखेर हे सगळं प्रकरण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापर्यंत पोहचलं. तत्कालीन सरकार अधिक अडचणीत येऊ नये यासाठी पक्षाने रामराव आदिक यांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास सांगितलं. 

ADVERTISEMENT

महिला छेडछाड प्रकरणी आंदोलन करणाऱ्या मुरकुटेंना महिला अत्याचारविरोधात अटक 

दरम्यान, या भानुदास मुरकुटे यांच्यामुळे रामराव आदिक यांना आपलं उपमुख्यमंत्री पद गमवावं लागलं होतं. त्याच मुरकुटे यांना आता महिला अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. 

ADVERTISEMENT

मुरकुटे यांनी 2019 साली शेतात गुंगीचे औषध देऊन अत्याचार केले आणि त्यानंतर वेगवेगळी आमिष दाखवून 2023 पर्यंत आपल्यावर अत्याचार सुरूच ठेवल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. 

हे ही वाचा >> Crime : तृतीयपंथीयाची निर्घृण हत्या! गळा चिरून मृतदेह विहिरीत टाकला, पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...

महिलेनं तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुरकुटे यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर राहुरी पोलिसांनी श्रीरामपूरचे माजी आमदार मुरकुटे यांना त्यांच्या निवसास्थावरून ताब्यात घेतलं. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे ही वाचा >> Horoscope In Marathi : 'या' राशीच्या लोकांसाठी नोकरीची सुवर्ण संधी? काहींच्या पदरात पडेल गडगंज श्रीमंती

कोण आहेत भानुदास मुरकुटे? 

भानुदास मुरकुटे हे पेश्याने चार्टर्ड अकाउंटंट (CA) आहेत. त्यांनी त्याची प्रॅक्टिस देखील सुरू केली होती. मात्र, नंतरच्या काळात त्यांनी राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 1980 साली त्यांनी पहिल्यांदा काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि ते विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1990 साली जनता दल आणि 1995 साली काँग्रेसकडून विधानसभेवर निवडून गेले. 

दरम्यान, 2004 साली शिवसेनेत असलेले बाळासाहेब विखे-पाटील हे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे श्रीरामपूर मतदारसंघातील आपलं तिकीट कापलं जाणार याची जाणीव मुरकुटे यांना झाली. त्यामुळे त्यांनी देखील तात्काळ काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे 2004 सालची श्रीरामपूर विधानसभा निवडणूक ही विखे विरुद्ध मुरकुटे अशी रंगली. ज्यामध्ये विखे-पाटलांनी मुरकुटेंना धूळ चारत मोठा विजय मिळवला. 

यानंतर भानुदास मुरकुटे हे सक्रीय राजकारणातून काहीसे बाजूला झाले. पण त्यानंतरही साखर कारखान्यांच्या माध्यमातून ते राजकारणात काही प्रमाणात सक्रीय होते. मागील 35 वर्षांपासून अशोक सहकारी कारखान्याचा कारभार ते सांभाळत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT