Crime : तृतीयपंथीयाची निर्घृण हत्या! गळा चिरून मृतदेह विहिरीत टाकला, पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...
Transgender Murder Case Update :भोकरदन तालुक्यातील शिरसगाव येथे तृतीयपंथीयाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. शिसरगाव मंडप शिवारातील सोमनाथ सहाने यांच्या शेतात तृतीयपंथीयाचा मृतदेह आढळला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
तृतीयपंथीयाची निर्घृण हत्या झाल्यानं खळबळ उडालीय
तृतीयपंथीयाचा गळा चिरून मृतदेह विहिरीत फेकला अन्...
एका शेतकऱ्यामुळं हा धक्कादायक प्रकार आला उघडकीस
Transgender Murder Case Update :भोकरदन तालुक्यातील शिरसगाव येथे तृतीयपंथीयाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. शिसरगाव मंडप शिवारातील सोमनाथ सहाने यांच्या शेतात तृतीयपंथीयाचा मृतदेह आढळला. विहिरित पाणी काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. ही खळबळजनक घटना उघडकीस आल्याने शेतकऱ्याने तातडीने पोलिसांशी संपर्क साधून या गंभीर घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक किरण बिडवे या घटनेचा पुढील तपास करत आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, भोकरदन तालुक्यातील शिरसगाव मंडप शिवारातील विहिरीत तृतीपंथीचा मृतदेह आढळला. गळा चिरून हत्या केली आणि त्यानंतर मृतदेह विहिरिता फेकल्याची माहिती समोर येत आहे. हत्या झालेली तृतीयपंथीय व्यक्ती 35 ते 40 वर्षांची असल्याचं समजते. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
हे ही वाचा >> Mumbai Rain : मुंबईत परतीच्या पावसाचा हाहाकार, मुंबईकरांसाठी पुढील काही तास महत्वाचे
भोकरदनचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून चारपायी बाजेच्या साह्याने बाहेर काढला. मृतदेहाचा गळा कापण्यात आलेला असून, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ही घटना अंदाजे दोन-तीन दिवसांपूर्वी घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, या तृतीयपंथी व्यक्तीचा गळा चिरून खून करून मृतदेह विहिरीत टाकला असण्याची शक्यता आहे.
हे वाचलं का?
शिसरगाव मंडप शिवारातील सोमनाथ सहाने यांच्या शेतात तृतीयपंथीयाचा मृतदेह आढळला. विहिरित पाणी काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला मृतदेह शेतात असलेल्या विहिरीच्या पाण्यात तरंगताना दिसला. हा धक्कादायक प्रकार उघडीस आल्यानंतर शेतकऱ्याने तातडीने पोलिसांशी संपर्क साधून या गंभीर घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत या संपूर्ण घटनेचा पंचनामा केला.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीं'ना मोठा झटका, खात्यात पैसे जमा होण्याची संपली मुदत?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT